‘राहु-केतू’ चित्रपटात शालिनी पांडे
अभिनेता पुलकित सम्राट आणि वरुण शर्मा यांची जोडी प्रेक्षकांसाठी पसंतीची मानली जाते. फुकरे प्रेंचाइजीद्वारे या दोघांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. आता पुन्हा एकदा वरुण आणि पुलकित नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसविण्यासाठी येणार असून या चित्रपटाचे नाव ‘राहु केतू’ आहे. या चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत शालिनी पांडे दिसून येणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, तर आता टीझर सादर करण्यात आला. या टीझरमध्ये वरुण आणि पुलकित यांची जोडी धमाल करताना दिसून येते. पूर्ण गाव ज्यांना पनौती मानतो, अशा युवकांची ही कहाणी आहे. हे युवक जेथे कुठे जातात, तेथे सर्व काम बिघडवून टाकत असतात. या चित्रपटात पुलकित आणि वरुणसोबत चंकी पांडे, पीयूष मिश्रा, अमित सियाल आणि अभिनेत्री शालिनी पांडे मुख्य भूमिकेत दिसून येईल. चित्रपटाची कहाणी आणि दिग्दर्शन विपुल विजने केले आहे. राहु केतू हा चित्रपट 16 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.