कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय वर्चस्व: विक्रम अभिषेक आणि वरुण आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर

06:37 AM Oct 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / दुबई

Advertisement

वेगाने वाढणारा भारतीय फलंदाज अभिषेक शर्माने आतापर्यंतचे सर्वोच्च रेटिंग गुण मिळवून त्याच्या आणि इतरांमधील अंतर वाढवले. तर वरुण चक्रवर्ती बुधवारी जारी केलेल्या नवीनतम आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत गोलंदाजीच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर राहिला.

Advertisement

तथापि, पाकिस्तानच्या सैम अयुबने टी-20 अष्टपैलु क्रमवारीत हार्दीक पांड्याची अव्वल स्थानावरल धाव संपुष्टात आणली आहे. नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने जेतेपद पटकावल्यानंतर अभिषेकने आयसीसी क्रमवारीत 931 गुणांसह जवळपास पाच वर्षांपासून चाललेला विक्रम मोडला. 25 वर्षीय या खेळाडूने इंग्लंडच्या उजव्या हाताच्या डेव्हिड मलानने 2020 मध्ये मिळवलेल्या 919 गुणांच्या मागील सर्वोत्तम रेटिंगला मागे टाकले, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे.

200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढण्यास मदत करणाऱ्या त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे आशिया चषक स्पर्धेत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेल्या डावखुऱ्या या गोलंदाजाने संघातील सहकारी सूर्यकुमार यादव 912 आणि विराट कोहली (909) यांच्या मागील सर्वोत्तम रेटिंगलाही मागे टाकले. अभिषेकने गेल्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. परंतु त्याने आशिया चषकातील सात सामन्यांमध्ये 44.85 च्या सरासरीने एकूण 314 धावा करुन एक अद्भूत विक्रम रचला आहे. तो आता दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या फिल साल्टपेक्षा एकूण 82 रेटिंग गुणांनी आघाडीवर आहे तर त्याचा भारताचा सहकारी तिलक वर्मा आशिया कपमध्ये 213 धावा केल्यानंतर फलंदाजांच्या विक्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

श्रीलंकेचा उजव्या हाताचा फलंदाज पथुम निशंका आशिया कपमध्ये 261 धावा केल्यानंतर कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंगसह दोन स्थानांनी प्रगती करत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे तर संघातील सहकारी कुशल परेरा (दोन स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर), पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (11 स्थानांनी प्रगती करत 13 व्या स्थानावर) आणि भारताचा संजू सॅमसन (आठ स्थानांनी प्रगती करत 31 व्या स्थानावर ) यांनीही त्याच स्पर्धेत काही प्रभावी प्रयत्नांनंतर प्रगती कली आहे. आशिया चषकात सात बळी घेतल्यानंतर चक्रवर्ती टी-20 क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज राहिला आहे. त्याच्या सोबतच त्याचा सहकारी कुलदीप यादव (नऊ स्थानांनी वरती 12 व्या स्थानावर), पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी (12 स्थानांनी वरती 13 व्या स्थानावर) आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रिशाद हुसेन (सहा स्थानांनी वरती 20 व्यव स्थानावर) यांचा ताझ्या क्रमवारीत समावेश आहे. सैम अयुबने पंड्याला मागे टाकत पहिल्यांदाच अष्टपैलु खेळाडूंच्या श्रेणीत अव्वल स्थान पटकावले आहे. अयुब भयानक फलंदाजी फॉर्ममध्ये होता. पण त्याने आठ बळी घेतल्याने चेंडूत चांगली कामगिरी केली आणि त्याच्या प्रयत्नांमुळे तो एकूण चार स्थानांनी वरती आला आणि अष्टपैलु खेळाडूंच्या यादीत पंड्याला मागे टाकत पहिल्या स्थानावर पोहोचला. पंड्या अयुबपेक्षा दुसऱ्या आणि आठ रेटिंग गुणांनी मागे पडला तर पाकिस्तानचा मोहम्मद नवाज (चार स्थानांनी वरती 13 व्या स्थानावर) आणि श्रीलंकेचा चरिथ असलंका (तीन स्थानांनी वरती 30 व्या स्थानावर) हे या आठवड्यात अष्टपैलु खेळाडूंच्या श्रेणीत स्थान मिळवणारे इतर खेळाडू होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article