विकाश यादव यास खंडणीप्रकरणी अटक
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेतील गुरुपतवंतसिंग पन्नू हत्या कारस्थान प्रकरणातील एक आरोपी विकाश यादव याला दिल्ली पोलिसांनी खंडणी प्रकरणात अटक केली होती अशी माहिती आता पुढे येत आहे. ही अटक 10 महिन्यांपूर्वी झाली होती. लॉरेन्स बिष्णोई या कुख्यात गुंडाच्या नावे खंडणी वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप ठेवण्यात आला होता.
दिल्लीतील एका उद्योजकाकडून खंडणी वसूल करण्याचा त्याने प्रयत्न केला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या उद्योजकाने पोलिसात तक्रार सादर केली होती. एका सरकारी अधिकाऱ्याने या उद्योजकाची ओळख विकाश यादव याच्याशी करुन दिली होती, असे या उद्योजकाने आपल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. लॉरेन्स बिष्णोई याने तुझी हत्या करण्याची सुपारी मला दिली आहे, अशी धमकी यादव याने दिली होती. यादव याने माझी सोन्याची चेन हिसकावली आणि माझ्यावर हल्ला केला असेही या उद्योजकाचे म्हणणे आहे. पोलिसांकडून तपास होत आहे.
ए