कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विजया इंटरनॅशनल क्रिकेट संघ विजेता

10:44 AM Sep 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे ग्रामीण तालुकास्तरीय 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत विजया इंटरनॅशनल स्कूलने बेळगाव पब्लिक स्कूलचा संघाचा पराभव करून विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो मैदानावर घेण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विजया इंटरनॅशनलने मर्यादित 8 षटकात 73 धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव पब्लिक स्कूलने 8 षटकात 63 धावा जमविल्या. विजया स्कूल संघचा जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विजया स्कूल तर्फे कर्णधार जियान सलीमवालेने 4 चौकारसह 35 धावांची खेळी केली. तर मोहम्मद तंजीनने 10, स्वंयम  एस.ने 1 षटकारसह 16 धावा केल्या. बेळगाव पब्लिक स्कूलतर्फे यष्टीरक्षक फलंदाज अरिहंत केने दोन  चौकारासह 19 डावा केल्या तर अष्टपैलू संभव कुडचीकरने 15 धावा व 3 गडी बाद केले. बक्षीस वितरण समारंभाला क्रीडाशिक्षक नदाफ, शट्टू पाटील, सुनील देसाई, प्रकाश पुजेर व संतोष कंगलगौडा आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देण्यात आले. विजया इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य नंदिनी सडेकर, प्रशासिका साजिया मुल्ला, उपप्राचार्य रामेश्वरी चावरिया व अमित चावरिया यांचे प्रोत्साहन मिळत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article