For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजय ताड खून प्रकरण : उमेश सावंतला सहा दिवसांची पोलीस कोठडी

01:33 PM Jun 01, 2024 IST | Abhijeet Khandekar
विजय ताड खून प्रकरण   उमेश सावंतला सहा दिवसांची पोलीस कोठडी
Umesh Sawant Vijay Tad murder case
Advertisement

जत प्रतिनिधी

भाजपचे माजी नगरसेवक, जत नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजी ताड यांच्या खूनप्रकरणी जत नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याला जत न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Advertisement

17 मार्च 2023 रोजी जत शहरापासून जवळच असलेल्या अल्फान्सो शाळेनजीक मुलांना आणण्यासाठी गेलेल्या नगरसेवक विजय ताड यांचा गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने जत येथील बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, आकाश सुधाकर इनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण व मिरज येथील निकेश उर्फ दाद्या दिनकर मदने या चौघाला अटक केली होती. या खुनाचा मुख्य मास्टर माइंड उमेश सावंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. खुनाच्या घटनेपासून उमेश सावंत फरार होता.

दरम्यान, या कालावधीत सावंत याने उच्च न्यायालयापर्यंत जामिनासाठी प्रयत्न केले होते. तसेच उमेश सावंत याचे वकील एस. टी. जाधव यांनी सांगली न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. 22 व 29 मे रोजी यावर कामकाज चालल्यानंतर न्यायालयाने जामीन फेटाळला होता. न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमेश सावंत हा सांगली न्यायालयात शरण आला. त्यानंतर 30 मे रोजी गुऊवारी जत पा†लसानी त्यास ताब्यात घेतले. शुक्रवारी सावंतला सकाळी अकराच्या सुमारास जत न्यायालयात उभा केले असता, जत न्यायालयाने सहा जून पर्यत म्हणजे सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. याचा तपास उपविभागीय पोलीस आ†धकारी सुनील साळुंखे करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.