Sangli Crime : पैसे देण्यास विलंब झाल्याने एकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
शामरावनगर पोलिसांची तत्काळ कारवाई; ५ संशयित अटक
सांगली : बचाव व्याजाने घेतलेले पैसे देण्यास विलंब झाल्याने एकाला लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला आहे. त्या व्यक्तीचा करण्यासाठी पुढे आलेल्या नातेवाईक तरुणीलाही मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
अलीम अरीफ शेख, मतीन शेख, आयान अकबर शेख, मुजमीर अरिफ शेख अशी त्या पाच जणांची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी शामरावनगर मध्ये घडला आहे.शहरातील शामरावनगर मध्ये राहण्प्रया एका व्यक्तीने संशयितअलीम शेख याच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतलेले होते. ते पैसे देण्यास उशीर झाल्याने अलीम शेख याने त्या व्यक्तीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचा मोबाईल हिसकावून घेऊन अलीम निघून गेला होता.
काही वेळाने संबंधित व्यक्ती अलीम याच्या कापड दुकानाजवळ गेली होती. त्यावेळी अलीम आणि मतीन शेख, आयान शेख, मुजमीर शेख यांनी त्या व्यक्तीला पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीचा बचाव करण्यासाठी त्याची मावस बहीण पुढे धावून आली त्यावेळी संशयितांनी तिलाही मारहाण करून तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.