For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’

11:50 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’
Advertisement

विजय म्हणजे फोट, फोटिंग, फोटिंगपणा : आमदार विरेश बोरकर यांनी घेतला समाचार

Advertisement

मडगाव : विजय सरदेसाई यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षावर बुधवारी टीका करताना, तो पक्ष ‘मशनरी’ असल्याचा आरोप केला होता. त्याचा समाचार घेताना आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी आमदार विजय सरदेसाई हे ‘कटाप्पा’ असल्याचा आरोप केला. मशनरी म्हणजे पैसे करणारे असा अर्थ सांगत आमदार विरेश बोरकर म्हणाले की, आमचा आरजीपी पैसे करण्यासाठी नाही. येथील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. याच्या उलट विजय सरदेसाई हे गोव्यातील राजकारणातील कटाप्पा आहेत.

काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला

Advertisement

2017 मधील विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला कौल दिला होता. सरकार स्थापन करण्यासाठी तीन आमदारांची गरज होती व गोवा फॉरवर्डचे तीन आमदार निवडून आले होते. त्यात गोवा फॉरवर्डला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून पैशांसाठी विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आणल्याचा दावा आमदार विरेश बोरकर यांनी केला. विजय सरदेसाई हे फोट, फोटिंग, फोटींगपणा करीत असल्याचा आरोपही आमदार विरेश बोरकर यांनी केला. काँग्रेसचा पाठिंबा मिळवून तीन आमदार निवडून आणल्यानंतर काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला. आताही तसेच करणार आहेत हे काँग्रेस पक्षाने ध्यानात ठेवावे. विजय सरदेसाई हे भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या विरोधात काहीच का बोलत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Tags :

.