कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानवापी फाइल्स चित्रपटात विजय राय

06:08 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कन्हैयालाल यांच्यावर आधारित चित्रपट

Advertisement

मागील काही वर्षांमध्ये देशातील खळबळजनक घटनांवर चित्रपट निर्माण करण्याचा प्रकार वाढला आहे. आता अशाच एका खळबळजनक घटनेवर नवा चित्रपट येत असून याचे नाव ‘ज्ञानवापी फाइल्स’ आहे. या चित्रपटात विजय राज मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Advertisement

या चित्रपटात विजयराज हे टेलर कन्हैयालाल यांच्या भूमिकेत आहेत. कन्हैयालाल यांची उदयपूरमध्ये क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. पोस्टरमध्ये विजयराय शिवणयंत्रावर बसलेले दिसून येत आहेत, तरु दसीरकडे पोलीस आणि उग्र जमाव दिसून येतो.

हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भरत श्रीनेता यांनी केले असून जयंत सिन्हा यांनी याची कहाणी लिहिली आहे. जून 2022 मध्ये उदयपूर येथे दोन दहशतवाद्यांनी कन्हैयालाल यांची दिवसाढवळ्या हत्या केली होती. या क्रूर कृत्यानंतर गुन्हेगारांनी त्याचा व्हिडिओही जारी केला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article