भारत अ युवा संघाचे नेतृत्व विहान मल्होत्राकडे
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी भारत अ युवा संघाचे नेतृत्व विहान मल्होत्राकडे सोपविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे हैदराबादच्या अॅरॉन जॉर्जची भारत ब युवा संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी तिरंगी मालिकेत भारत अ, भारत ब आणि अफगाणचे 19 वर्षांखालील संघ सहभागी होत आहेत.सदर स्पर्धा बेंगळूरमध्ये 17 ते 30 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोन आक्रमक युवा फलंदाज इतर स्पर्धांमध्ये खेळत असल्याने ते या तिरंगी मालिकेत सहभागी होवू शकणार नाहीत. तीन देशांच्या या तिरंगी मालिकेत भारत अ युवा संघाच्या उपकर्णधारपदी अभीज्ञान कुंडूची तर भारत ब संघाच्या उपकर्णधारपदी वेदांत त्रिवेदीची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुष म्हात्रे सध्या रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे.
भारत अ युवा संघ-विहान मल्होत्रा (कर्णधार), अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार), वाफी कच्छी, व्ही. आचार्य, व्ही. के. विनीत, आर. लक्षा, ए. रापोले, कनिष्क चौहान, खिलान पटेल, अनमोलजित सिंग, मोहम्मद इनान, हेनील पटेल, अशुतोष माहीदा, आदित्य रावत आणि मोहम्मद मलिक.
भारत ब युवा संघ- अॅरोन जॉर्ज (कर्णधार), वेदांत त्रिवेदी (उपकर्णधार), युवराज गोहील, एम. चेवडा, राहुल कुमार, हरिवंश सिंग, अन्वय द्रवीड, आर. एस. आंबरीश, बी. के. किशोर, नमन पुष्पक, हेमचुडेशान, उद्धव मोहन, इशान सूध, दीपेश व रोहीत कुमार दास