For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोविंदराजन पद्मनाभन यांना विज्ञानरत्न पुरस्कार

06:32 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोविंदराजन पद्मनाभन यांना विज्ञानरत्न पुरस्कार
Advertisement

33 पुरस्कारांची घोषणा : चांद्रयान-3 चे वैज्ञानिक-इंजिनियर होणार सन्मानित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने विज्ञान-तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संशोधक-वैज्ञानिक आणि इंजिनियर्सना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा केली आहे. यावेळी प्रख्यात बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. याचबरोबर चांद्रयान-3 च्या वैज्ञानिक आणि इंजिनियर्सना विज्ञान टीम पुरस्कार दिला जाईल.

Advertisement

केंद्र सरकारने 33 राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील व्यक्ती किंवा टीमकडून नामांकन केले जाते.

विज्ञान श्री पुरस्कार

खगोलशास्त्रज्ञ अन्नपूरिणी सुब्रमण्यम, कृषी शास्त्रज्ञ आनंदरामकृष्णन, अणुऊर्जा तज्ञ आवेश कुमार त्यागी, जीवशास्त्राचे प्राध्यापक उमेश वार्ष्णेय आणि जयंत भालचंद्र उदांवकर, पृथ्वी वैज्ञानिक प्राध्यापक सईद वजीह अहमद नकवी, इंजिनियरिंगचे प्राध्यापक भीम सिंह, गणिताचे प्राध्यापक आदिमूर्ति आणि प्राध्यापक राहुल मुखर्जी, औषध संशोधक डॉक्टर संजय बेहारी, भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक लक्ष्मणन मुत्थुस्वामी आणि प्राध्यापक नवकुमार मंडल तर तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्राध्यापक रोहित श्रीवास्तव यांना विज्ञान श्री पुरस्कार देण्यात येणार आहे.

विज्ञान युवा पुरस्कार

कृषी शास्त्रज्ञ कृष्णमूर्ति एस.एल. आणि स्वरुप कुमार पारिदा, जीवशास्त्रज्ञ राधाकृष्णन महालक्ष्मी आणि प्राध्यापक अरविंद पेनमात्सा, रसायनशास्त्रज्ञ विवेक पोल्शेत्तिवर आणि विशाल राय, पृथ्वी वैज्ञानिक कॉक्सी मॅथ्यू कोल, इंजिनियरिंग वैज्ञानिक अभिलाष आणि राधाकृष्ण गंति, पर्यावरण वैज्ञानिक पूरबी सैकिया आणि बप्पी पॉल, गणित तसेच कॉम्प्युटर वैज्ञानिक महेश रमेश काकडे, औषधाच्या क्षेत्रात जितेंद्र कुमार साहू आणि प्रज्ञ ध्रूव यादव, भौतिकशास्त्रज्ञ उर्वशी सिन्हा, अंतराळविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकरता दिगेंद्रनाथ स्वॅन तर नवोन्मेषाच्या क्षेत्राकरता प्रभु राजगोपाल यांना विज्ञान युवा पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

Advertisement
Tags :

.