For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

19 एप्रिलला झळकणार विद्याचा चित्रपट

06:19 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
19 एप्रिलला झळकणार विद्याचा चित्रपट
Advertisement

दो और दो प्यार चित्रपटाचा ट्रेलर सादर

Advertisement

विद्या बालन, इलियाना डिक्रूज, प्रतीक गांधी आणि सेंधिल राममूर्ती यांचा चित्रपट ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर सादर करण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मजेशीर टीझर पाहिल्यावर चित्रपटासंबंधी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आता ट्रेलरने चाहत्यांच्या उत्सुकतेची पातळी आणखी वाढविली आहे.

शीर्षा गुहा ठाकुरता यांच्या दिग्दर्शनात निर्मित या चित्रपटात पती-पत्नीच्या नात्याची कहाणी दर्शविण्यात आली आहे. विद्याने यात काव्या तर प्रतीक गांधीने अनिरुद्ध ही व्यक्तिरेखा साकारली आहे. दोघेही पती-पत्नी असून त्यांच्या नात्यात काहीच सुरळीत नसते. विद्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर विक्रम (सेंधिल राममूर्ती) सोबत सुरू असते आणि अनिरुद्धही रोजीच्या (इलियाना) प्रेमात असतो. दोघेही स्वत:च्या जोडीदाराला फसवत असतात. परंतु एका रात्री सर्वकाही बदलून जात असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

हा चित्रपट 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनचा चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये यासंबंधी मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जान्हवी कपूरच्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाशी सामना होणार आहे.

Advertisement
Tags :

.