For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वामिका गब्बीसोबत झळकणार राजकुमार

06:32 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
वामिका गब्बीसोबत झळकणार राजकुमार
Advertisement

अभिनेता राजकुमार राव सध्या ‘श्रीकांत’ या चित्रपटावरून चर्चेत आहे. उद्योजक श्रीकांत बोला यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट 10 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर राजकुमार हा ‘मिस्टर अँड मिसेस माही’, ‘स्त्राr 2’ आणि वेबसीरिज ‘गन्स अँड गुलाब’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. दिनेश विजानच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्माण होणाऱ्या चित्रपटातही राजकुमार राव मुख्य भूमिकेत असेल. या चित्रपटात वामिका गब्बी नायिकेची भूमिका साकारणार आहे.

Advertisement

या चित्रपटाची कहाणी एका छोट्या शहरावर आधारित असून यात एका असाधारण स्थितीत अडकलेल्या प्रेमीयुगुलाचा प्रवास दर्शविण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण शर्मा करणार आहे. करण शर्माने यापूर्वी ‘शिद्दत’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. राजकुमार सध्या राज शांडिल्याचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘विक्की विद्या का वो वाला वीडियो’चे चित्रिकरण करत आहे. तर वामिका ही दिग्दर्शक एटलीच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील आहे. यात वरुण धवन मुख्य भूमिकेत असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.