महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मुख्यमंत्र्यांचा खासगी विमानातून प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल

06:26 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपची सडकून टीका : राज्यातील दुष्काळाकडे राज्य सरकारचे दुर्लक्षच

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यात दुष्काळामुळे जनतेचे प्रचंड हाल होत असून याकडे दुर्लक्ष केलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्यासोबत आलिशान खासगी विमानातून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर राज्य भाजपने सडकून टीका केली आहे. तीन दिवसांपूर्वी खासगी विमानातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा यांच्यासमवेत दिल्लीहून बेंगळूरकडे प्रवास केलेला व्हिडिओ मंत्री जमीर अहमद खान यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यावरून भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

राज्यात भीषण दुष्काळ पडला असून जनता आर्थिक संकटात सापडली आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने उलटले तरी एकही ख•ा बुजविण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे निकटवर्तीय जमीर अहमद खान हे दिखाऊपणापेक्षा कमी नाहीत, असे भाजपने ट्विट केले आहे. राज्यातील जनतेच्या कराच्या रकमेवर खासगी जेटमधून प्रवास करून मजा घेणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यातील गरीब जनतेची चेष्टा करत आहेत. याबाबत व्हायरल व्हिडिओच पुरावा असल्याचा भाजपने संताप व्यक्त केला आहे.

जनतेचा अपमान : आर. अशोक

राज्यातील जनता आणि शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी विशेष विमानाने प्रवास करून जनतेचा अपमान केला आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. गेल्या सात महिन्यांत साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर 60 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पिकवलेली पिके नष्ट झाली आहेत. राज्यात अभूतपूर्व दुष्काळाने थैमान घातले आहे. अशा स्थितीत खर्चात कपात न करता विशेष विमानातून मौजमस्ती केली आहे, अशी टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

विमानात एकट्याने प्रवास करणाऱ्या मोदींना काय म्हणाल..? : सिद्धरामय्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्झरी विमानातून एकट्याने प्रवास करत आहेत. यावर भाजप नेते काय म्हणणार, असा प्रश्न करत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला. सिद्धरामय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी दिल्लीहून बेंगळूरला परतताना आलिशान विमानातून प्रवास केल्याच्या भाजपच्या व्यापक टीकेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कशाने प्रवास करतात ते भाजपला विचारा. लक्झरी विमानात एकटेच प्रवास करतात. यावर भाजप उत्तर का देत नाही?, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

जनतेचा पैसा म्हणजे आकाशात जत्रा : विजयेंद्र

राज्यातील जनतेचा पैसा म्हणजे आकाशात जत्रा असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी सत्ताधारी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्या अधिकृत सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट करताना ते म्हणाले, काँग्रेस सरकार सत्तेवर असताना राज्यात दुष्काळाचे सावट आहे. शेतकरी आत्महत्येला सामोरे जात आहेत. सर्वसामान्यांचे जीवन असह्या झाले आहे. एवढ्या गंभीर परिस्थितीतही मंत्री जमीर अहमद खान यांच्यासोबत आलिशान जेट विमानात प्रवास करणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मौजमजा करत आपला जीवनप्रवास दाखवून दिला आहे, हे या राज्याचे दुर्दैव आहे, असे म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article