कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रणजी फायनलमध्ये विदर्भाचे वर्चस्व

06:48 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथ्या दिवशी 286 धावांची भक्कम आघाडी : करुण नायरचे नाबाद शतक, दानिश मालेवारची अर्धशतकी खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ नागपूर

Advertisement

केरळविरुद्ध रणजी करंडकातील अंतिम सामन्यात विदर्भाने आपले वर्चस्व गाजवताना चौथ्या दिवसअखेरीस 4 बाद 249 धावा करत 286 धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. विदर्भाचा स्टार फलंदाज करुण नायरने धमाकेदार शतकी खेळी करताना यंदाच्या हंगामातील तिसरे शतक झळकावले. युवा फलंदाज दानिश मालेवारने 73 धावांची खेळी साकारली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा नायर 132 तर अक्षय वाडकर 4 धावांवर खेळत होते. आज सामन्याच्या शेवटच्या दिवशी सामना विदर्भाचा संघ आणखी काय कमाल दाखवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नागपूरातील व्हीसीए मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात 379 धावा केल्या. यानंतर केरळनेही विदर्भाला प्रत्युत्तर देताना 342 धावा केल्या. कर्णधार सचिन बेबीने 98, आदित्य सरवटेने 79 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे विदर्भाला पहिल्या डावात 37 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली. विदर्भाकडून दर्शन नळकांडे, हर्ष दुबे व पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

दुसऱ्या डावात खेळताना विदर्भाने पार्थ रेखाडे (1) व ध्रुव शोरे (5) यांच्या विकेट्स झटपट गमावल्या. सलामीवीर झटपट बाद झाल्याने विदर्भाची 2 बाद 7 अशी स्थिती झाली होती. अशा स्थितीत स्टार फलंदाज करुण नायर व दानिश मालेवार यांनी डाव सावरला. या जोडीने तिसऱ्या विकेट्ससाठी 182 धावांची भागीदारी साकारताना केरळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. यादरम्यान, नायरने यंदाच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामामधील नववे तर रणजी मोसमातील चौथे शतक झळकावताना 280 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह नाबाद 132 धावा केल्या. त्याला मालेवारने दमदार साथ देताना 5 चौकारासह 73 धावांची खेळी केली. त्याला अक्षय चंद्रनने बाद करत केरळला मोठे यश मिळवून दिले. यानंतर फलंदाजीला आलेल्या यश राठोडने 2 चौकारासह 24 धावांची खेळी केली. खेळ संपण्यास काही षटके बाकी असताना राठोड बाद झाला. दिवसअखेरीस करुण नायर व कर्णधार अक्षय वाडकर यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 90 षटकांत 4 गडी गमावत 249 धावा केल्या होत्या. विदर्भाकडे आता 286 धावांची भक्कम आघाडी असून आज सामन्याच्या पाचव्या दिवशी केरळच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ पहिला डाव 379 व दुसरा डाव 90 षटकांत 4 बाद 249 (पार्थ रेखाडे 1, ध्रुव शोरे 5, दानिश मालेवार 73, करुण नायर खेळत आहे 132, यश राठोड 24, अक्षय वाडकर खेळत आहे 4, निधीश, जलज सक्सेना, आदित्य सरवटे व अक्षय चंद्रन प्रत्येकी एक बळी).

केरळ पहिला डाव सर्वबाद 342.

करुण नायरचे शतकानंतर हटके सेलिब्रेशन

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणाऱ्या या स्टार फलंदाजाने या रणजी मोसमातील चौथे आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 23 वे शतक 184 चेंडूत झळकावले. या देशांतर्गत हंगामात करुणने नवव्यांदा शतक ठोकले आहे. करूणने शतक पूर्ण होताच हेल्मेट काढून बॅट उंचावत आपल्या शतकाचा आनंद साजरा केला. यानंतर त्याने बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत बोटांनी नऊचा आकडा दाखवला. करूणचे हे एका देशांतर्गंत हंगामातील नववे शतक आहे. हेच नववे शतक पूर्ण झाले असल्याचे त्याने दाखवले. त्याचा हा अंदाज सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूणं कामगिरी करणाऱ्या करुण नायरसाठी बीसीसीआय आता तरी लक्ष देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article