For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय स्क्वॅशपटूंची विजयी सलामी

06:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय स्क्वॅशपटूंची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था/होस्टन

Advertisement

येथे सुरु झालेल्या विश्व कनिष्ठांच्या सांघिक स्क्वॅश स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी विजयी सलामी दिली. पुरुषांच्या विभागात भारताने कुवेतचा तर महिलांच्या विभागात भारताने चीन तैपेईचा पराभव केला. मुलांच्या विभागातील फ गटातील सलामीच्या सामन्यात भारताने कुवेतवर 3-0 असा एकतर्फी विजय नोंदविला. या लढतीत भारताच्या के. एस. अरिहंतने कुवेतच्या अब्दुल्ला अलीचा 11-9, 11-8, 11-6, दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या ए. वझिरअलीने कुवेतच्या खलिद फौझेनचा 11-6, 5-11, 11-8, 11-4, तिसऱ्या सामन्यात भारताच्या युवराज वाधवानीने कुवेतच्या जेसिम घरिबचा 11-4, 10-12, 11-5, 11-0 असा पराभव केला.

मुलींच्या विभागातील ड गटातील सलामीच्या लढतीत भारताने चीन तैपेईचा 3-0 असा फडशा पाडला. भारताच्या निरुपमा दुबेने चीन तैपेईच्या लीचा 11-1, 11-2, 11-1, दुसऱ्या सामन्यात भारताच्या शमिना रियाझने चीनच्या पर्लचा 11-3, 11-3, 11-5, तिसऱ्या सामन्यात अनहात सिंगने चीन तैपेईच्या चेनचा 11-1, 11-1, 11-4 असा पराभव केला. मुलांच्या विभागात भारताचा पुढील सामना ब्राझील बरोबर होणार आहे. मुलींच्या विभागात भारताची लढत ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया बरोबर होणार आहे. मुलींच्या विभागात भारताचे दोन सामने राहतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.