महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

06:22 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ क्वालालंपूर (मलेशिया)

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने क गटातील सलामीच्या सामन्यात बलाढ्या कोरीयाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव केला. भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयी सलामीने प्रारंभ केला आहे. या सामन्यात भारताच्या अर्जितसिंग हुंडालने शानदार हॅट्ट्रीक नोंदविली.

Advertisement

क गटातील खेळविण्यात आलेल्या या सामन्यात अरायजीत सिंग हुंडालने 11 व्या, 16 व्या, 41 व्या मिनिटाला असे 3 गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. भारताचा चौथा गोल अमनदीपसिंगने 30 व्या मिनिटाला नोंदविला. कोरियातर्फे डी. लिमने 38 व्या तर मिंकओन किमने 45 व्या मिनिटाला गोल केले. 2021 साली भुवनेश्वरमध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये भारतीय कनिष्ठ हॉकी संघाला कांस्य पदकाच्या सामन्यात  फ्रान्सकडून हार पत्करावी लागली होती.

सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर भारतीय संघाला स्थिर होण्यास काही वेळ लागला. पण अरायजीत सिंगने 11 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताचे खाते उघडले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत सामन्यातील हा एकमेव गोल नोंदविला गेला. सामन्याच्या दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारताने आणखी 2 गोल केले. अरायजीत सिंग आणि अमनदीप यांनी अनुक्रमे 16 व्या आणि 30 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविले. मध्यंतरापर्यंत भारताने कोरियावर 3-0 अशी आघाडी मिळवली होती. तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत कोरियातर्फे 2 गोल तर भारतातर्फे 1 गोल नोंदविला गेला. 38 व्या मिनिटाला कोरियाचे खाते लिमने उघडले. भारतातर्फे अरायजीत सिंगने 41 व्या मिनिटाला गोल नोंदवून आपली हॅट्ट्रीक साधताना भारताचा चौथा गोल नोंदविला. तर 45 व्या मिनिटाला किमने कोरियाचा दुसरा गोल केला. अखेर भारताने हा सामना 4-2 असा जिंकून कोरियाचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत भारताचा पुढील सामना स्पेन बरोबर होणार आहे. स्पेन, कॅनडा, भारत आणि कोरिया यांचा क गटात समावेश आहे. भारताने यापूर्वी ही स्पर्धा 2001 आणि 2016 साली जिंकली होती तर 1997 साली भारताने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते.

Advertisement
Tags :
#tarun
Next Article