For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, ओसाका, गॉफ, मेदव्हेदेव, पेगुला यांची विजयी सलामी

06:58 AM Jul 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  ओसाका  गॉफ  मेदव्हेदेव  पेगुला यांची विजयी सलामी
Advertisement

सुमित नागल, पॅरी, लेजल, डुलहि#डे यांचे आव्हान समाप्त

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या विम्बल्डन ग्रासकोर्ट ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा विद्यमान विजेता कार्लोस अल्कारेझ, रशियाचा मेदव्हेदेव, रुमानियाचा कास्पर रूड, कॅनडाचा बिगर मानांकित शेपोव्हॅलोव्ह, स्वीसचा वावरिंका यांनी पुरूष एकेरीत विजयी सलामी दिली. महिलांच्या विभागात जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची कोको गॉफ, इटलीची मारिया सॅकेरी, पेगुला यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. भारताच्या सुमित नागलचे आवाहन पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या विद्यमान विजेत्या अल्कारेझने इस्टोनियाच्या मार्क लेजलचा 7-6 (7-3), 6-2, असा पराभव करत विजयी सलामी दिली. अन्य एका सामन्यात रशियाच्या पाचव्या मानांकित डॅनिल मेदव्हेदेवने अॅलेक्सझांडेर कोव्हासेविकचा 6-3, 6-4, 6-2, रुमानियाच्या आठव्या मानांकित कास्पर रूडने अॅलेक्स बोल्टचा 7-6 (7-2), 6-4, 6-4 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. कॅनडाच्या बिगर मानांकित डेनिस शेपोव्हॅलोव्हने निकोलास जेरीचा 6-1, 7-5, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. स्वीसच्या स्टॅनिसलासला वावरिंकाने या स्पर्धेत विजयी सलामी देताना पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनच्या ब्रुमचा 6-3, 7-5, 6-4 असा पराभव केला. 39 वर्षीय वावरिंकाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत तीन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून तो सध्या एटीपीच्या मानांकनात 55 व्या स्थानावर आहे. या स्पर्धेत यावेळी वावरिंका हा पुरूष एकेरीतील सर्वात वयस्कर टेनिसपटू आहे.  मात्र भारताच्या सुमित नागलचे आवाहन पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पहिल्या फेरीतील सामन्यात सर्व्हियाच्या मिमोर केमॅनोव्हीकने नागलचा 6-2, 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केल्याने नागलचे या स्पर्धेतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. हा सामना अडीच तास चालला होता. सर्व्हियाच्या केमॅनोव्हीकने या सामन्यात सहा बिनतोड सर्व्हिसची तसेच दोन दुहेरी चुका केल्या. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत विम्बल्डन स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये खेळणारा सुमित नागल हा पहिला भारतीय टेनिसपटू आहे.

महिलांच्या एकेरीतील पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या नाओमी ओसाकाने डायना पेरीचा 6-1, 1-6, 6-4 अशा सेटसमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. ओसाकाने तब्बल सहा वर्षानंतर या स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदविला आहे. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफने कॅरोलिनी डुलहिडेचा 6-1, 6-2 अशा सेटस्मध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. गेल्या वर्षी या स्पर्धेत गॉफला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात राडूकेनुने रिनेटा झेराझुआचा 7-6 (7-0), 6-3 असा पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत अॅलेक्सेंड्रोव्हाने प्रकृती नादुरुस्तीमुळे  शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने स्पर्धा आयोजकांनी झेराझुआला प्रमुख ड्रॉमध्ये प्रवेश दिला होता. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून आर्यना साबालेंका आणि व्हिक्टोरिया अझारेंका यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. इटलीच्या मारिया सॅकेरीने केसलरचा 6-3, 6-1 तसेच इटलीच्या सातव्या मानांकित जस्मीन पावोलिनीने सारा टोर्मोचा 7-5, 6-3 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या जेसीका पेगुलाने मंगळवारी येथे विजयी सलामी देताना आपल्या देशाच्या व्रुगेरचा 6-2, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. गेल्या वर्षी या स्पर्धेत पेगुलाने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. हा सामना पेगुलाने केवळ 49 मिनीटांत जिंकला.

Advertisement
Tags :

.