For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केएलएस, लव्हडेल, हेरवाडकर, केएलईची विजयी सलामी

10:19 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
केएलएस  लव्हडेल  हेरवाडकर  केएलईची विजयी सलामी
Advertisement

हनुमान चषक क्रिकेट स्पर्धा : सिद्धार्थ रायकर, करण रामगुरवाडी, अजय लमाणी, आदित्य जाधव सामनावीर

Advertisement

बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत उद्घाटन दिवशी लव्हडेल स्कूल, एम. व्ही. हेरवाडकर, केएलएस, केएलई संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजयी सलामी दिली. सिद्धार्थ रायकर, करण रामगुरवाडी, अजय लमाणी, आदित्य जाधव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. प्लॅटिन ज्युब्ली मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रुमख पाहुणे म्हणून पुरस्कर्ते आनंद सोमनाचे, एसकेई सोसायटीचे क्रीडा विभाग चेअरमन आनंद सराफ, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे दीपक पवार, बाळकृष्ण पाटील, प्रमोद पालेकर, प्रमोद जपे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या सामन्यात लव्हडेल संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 170 धावा केल्या. त्यात अजय लमाणीने 4 षटकार, 9 चौकारांसह 113 धावा करुन शतक झळकविले. अनुषने 13 केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ज्ञान प्रबोधनने 20 षटकात 7 गडी बाद 133 धावा केल्या. त्यात संजल गोपालने 36, पार्थ उचगावकरने 16, तर अद्वैत व इंद्रनिल यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. लव्हडेलतर्फे वेदवाणीने 2 गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात 8 गडी बाद 165 धावा केल्या. त्यात हर्ष नाशिपुडीने 51, आदित्य जाधवने 41, लक्ष्य खतायतने 18 धावा केल्या. ठळकवाडी ब तर्फे जोतिबाने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडीने 16 षटकात 8 गडी बाद 92 धावा जमविल्या. त्यात उमेश बेळगावकरने 20 धावा केल्या. हेरवाडकरतर्फे सोहन पुजारी व आदित्य जाधव यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 गडी बाद 182 धावा केल्या. त्यात आर्यन मालुने 63, करण रामगुरवाडीने 35, आदित्य भोगणने 33 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना ठळकवाडी ब चा डाव 11.3 षटकात 66 धावांत आटोपला. केएलईतर्फे विख्यात व प्रथमराज यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात बिरला इंटरनॅशनने प्रथम फलंदाजी करताना 13.4 षटकात सर्वगडी बाद 53 धावा केल्या. केएलएसतर्फे सिद्धार्थ रायकरने 11 धावांत 5 तर सुरेंद्र पाटीलने 1 धाव 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना केएलएसने 7.1 षटकात 2 बाद 54 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात सिद्धार्थ रायकरने नाबाद 23 तर सोहम पाटीलने 16 धावा केल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.