बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची बैठक खेळीमेळीत
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रीडा खाते मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. गोवावेस येथील रोटरी मनपा जलतरण तलावाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत प्रारंभी मी. इंडिया सुनील आपटेकर यांनी स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर यांनी कार्याचा आढावा घेतला. हेमंत हावळ यांनी मागील वर्षीचा अहवाल सादर केला. बसवराज अरळीमठ यांनी जमा-खर्चाचा लेखा सादर केला. या बैठकीत रिक्त असलेल्या जागांसाठी नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्षपदी सुनील आपटेकर व दिलीप चिटणीस सहसेक्रेटरीपदी प्रशांत सुगंधी व मारुती देवगेकर यांनी सर्वानुमते निवड करण्यात आली. केतकी पाटील हिची महिला अॅथलिट तर प्रताप कालकुंद्री यांची पुरुष अॅथलिट कमिशन म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत प्रकाश पुजारी, अजित सिद्दन्नावर, अविनाश पोतदार, राजाराम मजुकर, एम. के. गुरव, मनोहर हुक्केरीकर, राजकुमार मोरे, दिनकर घोरपडे, शेखर जाणवेकर, सुनील पवार, नूर मुल्ला, सुनील अष्टेकर, अनंत लंगरकांडे, नागराज कोलकार, सचिन मोहीते, गणेश गुंडप्पण्णावर, आकाश हुलीयार, सुनील निंगन्नावर, क्रितेश कावळे, प्रवीण कणबरकर आदी उपस्थित होते.