एम.व्ही.हेरवाडकर स्कूलतर्फे विजयी रॅली
बेळगाव :
राज्य, राष्ट्रीय स्तरावरील मिनी ऑलिंम्पिकमध्ये विद्यार्थ्यांनी विजय मिळविल्याबद्दल एम. व्ही. हेरवाडकर स्कूलच्यावतीने विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीचे शनिवारी 9.30 वाजता प्रमुख पाहुणे दिलीप चिटणीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये मिनी ऑलिंम्पिक, फादर एडी फुटबॉल चषक, युनायटेड गोवन्स चषक, दासाप्पा शानभाग चषक, हॉकी चषक, बॅडमिंटन, रनिंग, ड्रॉईंग आदी विविध विभागांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांसह एनसीसी, बँड पथक सहभागी झाले होते. या रॅलीची सुरुवात हेरवाडकर स्कूलपासून करण्यात आली. रॅली खानापूर रोड, टिळकवाडी मेन रोड, आरपीडी कॉलेज कॉर्नर, गोवावेस, शुक्रवारपेठ, देशमुख रोड, जी. जी. चिटणीस स्कूलमार्गे एम. व्ही. हेरवाडकर स्कूलपर्यंत काढण्यात आली. यावेळी अजित कुलकर्णी, राजेश शिवलकर, ज्ञानेश कलघटगी, एस. वाय. प्रभू, अलका कुलकर्णी, हिमांगी प्रभू, गायत्री गावडे, पंकज शिवलकर, प्रवीण पुजार, यशश्री देशपांडे, प्राचार्या शोभा कुलकर्णी व विद्यार्थी उपस्थित होते. रॅलीला टिळकवाडी पोलीस स्थानकाचे मोलाचे सहकार्य लाभले.