महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंगडी, भरतेश, जैन, संत मीराची विजयी सलामी

10:46 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : पोलाईट्स ऑफ बेळगाव वर्ल्डवाइडतर्फे सेंट पॉल्स हायस्कूलच्या सहकार्याने 56 व्या फादर एडी स्मृतीचषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात अंगडी इंटरनॅशनल हायस्कूल, भरतेश इंग्रजी माध्यम हायस्कूल, जैन इंटरनॅशनल हायस्कूल, संत मीरा इंग्रजी माध्यम हायस्कूल संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी या संघावर मात करत विजयी सलामी दिली.

Advertisement

फादर एडी फुटबॉल स्पर्धा

Advertisement

सोमवारी सकाळी सेंट पॉल्स हायस्कूलच्या हॉस्टेल मैदानावर  फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात सुरेश अंगडी इंटरनॅशनल स्कूल संघाने केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 कॅम्प संघावर 3-2 असा पेनाल्टीशूट आउटवर विजय संपादन केला. दुसऱ्या सामन्यात भरतेश इंग्रजी माध्यम हायस्कूल संघाने फिनिक्स हायस्कूल संघावर पेनल्टी शूटआउटवर 4-2 असा विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात वरद देसाई याने नोंदवलेल्या एकमेव विजयी गोलावर महिला विद्यालय इंग्रजी माध्यम हायस्कूल संघाने जैन इंटरनॅशनल हायस्कूल संघावर 1-0 असा रोमहर्षक सामन्यात निसटता विजय संपादन केला. चौथ्या सांगण्यात संत मीरा हायस्कूल संघाने गुड शेफर्डस संघावर रोमहर्षक सामन्यात पेनल्टी शूटआउटवर 4-2 असा विजय संपादन करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या उद्घाटन समारंभाला बालविकास व महिला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह नागेश छाब्रिया, रिद्धी छाब्रिया, सुमुख छाब्रिया, स्पर्धा संयोजक अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, स्पर्धा सेक्रेटरी परेश मुरकुटे, कार्याध्यक्ष अमित पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article