महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेन्नईतील विजयाने सुमित नागल टॉप 100 मध्ये

06:45 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू सुमित नागलने येथे झालेल्या एटीपी चेन्नई ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. चॅलेंजर स्तरावरील त्याने मिळविलेले हे पाचवे जेतेपद आहे. अंतिम फेरीत त्याने इटलीच्या लुका नार्दीचा पराभव केला. या विजयानंतर तो क्रमवारीत टॉप 100 मध्ये पोहोचला आहे.

Advertisement

सुमितने नार्दीवर 6-1, 6-4 अशी मात केली. या स्पर्धेत सुमित जबरदस्त फॉर्ममध्ये दिसून आला. त्याने एकही सेट न गमविता ही स्पर्धा जिंकली. ‘मी फार भावूक झालोय, किमान पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविणे हे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. मायदेशात घरच्या प्रेक्षकांसमोर स्पर्धा जिंकण्याचे समाधान वेगळेच असते. या समाधानाचे, आनंदच वर्णनच शब्दच सुचत नाहीत. आनंदाने प्रत्येकजण अश्रू ढाळत होता,’ अशा भावना सुमितने व्यक्त केल्या. यावर्षी त्याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमच्या मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले आणि दुसरी फेरीही गाठताना पहिल्या फेरीत पहिल्या 30 मध्ये असणाऱ्या अलेक्झांडर बुबलिकला (27 वे मानांकन) हरविले होते. दुसऱ्या फेरीत मात्र चीनच्या खेळाडूकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता.

या यशस्वी कामगिरीमुळे सुमितला ताज्या एटीपी क्रमवारीत टॉप 100 मध्येही स्थान मिळाले आहे. एटीपी क्रमवारीत तो आता 98 व्या स्थानावर असून टॉप शंभरमध्ये स्थान मिळविणारा तो 2019 नंतरचा पहिला भारतीय आहे. 2019 मध्ये प्रज्नेश गुणेश्वरनने पहिल्या शंभरात स्थान मिळविले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article