For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकीय गँगवॉरचे बळी !

06:32 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजकीय गँगवॉरचे बळी
Advertisement

राजकारणातील गँगवॉरचा इतिहास पाहिला तर हे बळी पूर्ववैमनस्य, राजकीय स्पर्धा आणि मतदारसंघातील विविध वाद यातूनच गेले आहेत. याला वेळीच आळा घातला नाही तर यापुढे असेच चालत राहणार हे मात्र निश्चित.

Advertisement

देश स्वतंत्र झाल्यानंतर येनकेन प्रकारेण मुंबई शहर प्रसिद्धीच्या झोतात राहीले. मग ते चांगल्या कामासाठी असो की वाईट कामासाठी. मुंबईचे नाव सातत्याने झळकत राहिले. याच मुंबईवर सत्ता गाजविण्यासाठी राजकारण्यांनी जीवाचा आटापिटा केला तर अंडरवर्ल्डमधील नामचीन टोळ्यांनी रक्ताचे पाट वाहिले. एवढे कऊन देखील मुंबई कोणाच्या अंमलाखाली आली नाही. आजतागायत ते प्रयत्न सुऊ आहेत. यासाठी एकमेकांचे जीव घ्यायलादेखील कोणी कमी नाही. मग ते अंडरवर्ल्ड असो की राजकारणातील शत्रुत्व असो. बळी तर जाणारच. असाच बळी गेल्या पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा गेला. हा बळी राजकारणातील वर्चस्व आणि राजकीय हेतुने प्रेरीत होऊन घेतलेला बदला होता. मात्र यामध्ये नाहक जीव गेला तो तरणाबांड अशा माजी नगरसेवकाचा. अभिषेक घोसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडणाऱ्या मॉरीस नोरोन्हा या मारेकऱ्याने देखील आत्महत्या करत आपले जीवन संपवले.

केवळ राजकीय सूड आणि आपल्याला विनाकारण बलात्काराच्या गुह्यात गोवल्याच्या संशयावऊन हे हत्यासत्र घडवून आणले. अभिषेक घोसाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र. नगरसेवक असताना अत्यंत अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती होती. तर त्यांच्याच मतदारसंघात मॉरिसने त्याचे कार्यालय थाटले होते. त्यालादेखील राजकारणाचे वेध लागले होते. मात्र अभिषेकमुळेच आपल्याला तुऊंगाची हवा खावी लागल्याचा त्याचा समज झाला होता. यासाठीच तो अभिषेकचा बळी घेण्यासाठी दबा धऊन बसला होता. अखेर त्याने वेळ साधली आणि फेसबुक लाईव्हवर अभिषेकला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्यानेदेखील स्वत:ला संपविले. एका तरूण नेत्याचा खून मुंबईच नाही तर जगातील अनेकांनी पाहिला. त्यापूर्वी उल्हासनगर येथे भाजपच्या गणपत गायकवाड या आमदाराने शिंदे गटाच्या नेत्याला भर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याची घटना ताजी होती. त्या प्रकरणाचा कुठे तपास सुऊ असतानाच घोसाळकर गोळीबार घटना घडल्याने, मुंबईसह देशभरात या घटनेची चर्चा झाली व एकप्रकारे खळबळ उडाली. वास्तविक पाहिले तर यापूर्वीदेखील राजकीय वैमनस्य अथवा स्पर्धेतून अनेक आमदार, नगरसेवक, कार्यकत्यांच्या देखील अशाच प्रकारे गोळ्या झाडून हत्या झाल्या आहेत. यामध्ये शिवसेना आमदार कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.

Advertisement

राज्यातील पहिली हत्या ही शिवसेना आमदाराची मुंबईत झाली होती. परळ भारतमाता चित्रपटगृहाशेजारील इमारतीसमोर राहणारे शिवसेनेचे विद्यमान आमदार विठ्ठल चव्हाण यांची 22 मार्च 1992 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी लालबाग-परळ येथे दहशत असलेल्या दुबईस्थित गुऊ साटमच्या इशाऱ्यावऊन बच्चा रावळ, प्रल्हाद पेडणेकर, अनिल देसाई उर्फ आर.के, नितीन आंगणे, संतोष ठाकुर उर्फ पोत्या यांनी हा गेम केला. प्रथम विठ्ठल चव्हाण यांच्याशी त्यांच्या राहत्या घरात चर्चा केली. मात्र चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी माऊन हत्या केली. गँगस्टरकडून एका विद्यमान आमदाराची हत्या होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना होती. यामुळे मुंबई पोलीसच नाही तर राज्य पोलीस आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यापूर्वी म्हणजे 12 जून 1987 रोजी डी.बी मार्ग येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक ऋषी मेहता यांना गोळ्या झाडून ठार केले होते. मेहता यांनी अनधिकृत बांधकामात रस घेतल्याने, त्यांचा गेम करण्यात आला. तसेच शिवडी येथील शिवसेनेचे नगरसेवक विनायक वाबळे यांना सुरेश मंचेकर या गँगस्टरने बाळा सिताराम परब, वसंत चव्हाण, पप्पु जाधव, जन्या पाशी आणि सुनिल जाधव यांच्या मदतीने मारले होते. वाबळे यांनी मंचेकरच्या अधिपत्याखाली असलेल्या अनधिकृत झोपड्यावर बुलडोझर चालविल्यामुळे त्यांचा गेम केला. यावेळी क्राईम ब्रँचने गुऊ साटमची प्रेयसी लक्ष्मी उर्फ लक्का हिच्यासह चार जणांना अटक केली होती. भांडुप परिसरात वर्चस्व असलेला तसेच विक्रमी मतांनी निवडून येणारा शिवसेनेचा नगरसेवक के.टी थापा याला भांडुप येथील मंगतराम पेट्रोलपंपाजवळ गोळ्या घालून ठार मारण्यात आले. छोटा राजनच्या इशाऱ्यावऊन अवधुत बोंडे, जितेंद्र मिठबावकर, सतीश वाळके, मधुकर दळवी, संभाजी कदम, विलास माने, साधु शेट्टी आदी दीड डझन गुंडांनी थापाचा गेम केला. थापाचे वाढते वर्चस्व आणि तो वरचढ होत असल्यानेच राजनने त्याचा गेम केला. त्यापूर्वी भांडुप येथेच अऊण गवळीने शिवसेना शाखाप्रमुख माऊती लक्ष्मण हळदणकरची हत्या केली होती. अरूण गवळी आणि हळदणकरचे पूर्ववैमनस्य होते.

दरम्यान, छोटा राजन आपला गेम करणार याची टिप थापाला यापूर्वीच लागली होती. यामुळे थापाने जे. जे. हत्याकांडातील गँगस्टर सुभाषसिंग ठाकुर याची भेट घेत कल्पना दिली होती. यावेळी सुभाषसिंग ठाकुरने थापाचे बोलणे दाउदशी देखील कऊन दिले होते. यामुळे थापा निर्धास्त होता. मात्र दाउदला अंधारात ठेवत छोटा राजनने थापाचा गेम वाजविला होता. तर दुसरीकडे अऊण गवळीने मुस्लिम लिगचे माजी आमदार झियाउद्दीन बुखारी याचा गोळया घालून गेम केला. बुखारीला मारण्यासाठी गवळीने 14 गुंड नागपाड्यात घुसविले होते. यावेळी बुखारीने बॉम्बस्फोट घडवून दगडी चाळ उडविण्याचा कट आखल्याची चर्चा त्यावेळेस जोरावर होती. मात्र खरे कारण अरूण गवळीलाच माहीत आहे. तसेच शिवसेनेची फायरब्रँण्ड महिला नगरसेवक आणि गँगस्टर अश्विन नाईकची पत्नी निता नाईक हीची हत्या उघडपणे अश्विन नाईकने केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार रमेश मोरे यांची अंधेरी चार बंगला येथे अरूण गवळीने प्रमोद घोगळे, सुनिल चव्हाण, राजु बटाटा, पांडुरंग मडवी, योगेश कराडकर, सुधीर सुर्वे, रवि करंजेकर आदींच्या मदतीने गोळ्या घालून हत्या केली. रमेश मोरेंची हत्या म्हणजे शिवसेनेला मोठा हादरा होता. त्यानंतर दोनच दिवसात भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांची खेतवाडीत गाडी आडवी घालून दाऊदचा हस्तक इजाज पठाणने हत्या घडवून आणली. राजकारणातील गँगवॉरच्या बळींचा हा इतिहास पाहिला तर खरोखरच अंगावर शहारे येतात.

- अमोल राऊत

Advertisement
Tags :

.