महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘महाअवतार’ चित्रपटात विक्की कौशल

06:14 AM Nov 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भगवान परशुराम यांच्यावर आधारित चित्रपट

Advertisement

अभिनेता विक्की कौशल याचा नवा चित्रपट ‘महाअवतार’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निर्माता दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्या या चित्रपटातील विक्की कौशलचा फर्स्ट लुकही सादर करण्यात आला आहे.

Advertisement

या फर्स्ट लुकमध्ये विक्की हा भगवान परशूराम यांच्या भूमिकेत दिसून येत आहे. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि मोशन पोस्टर निर्मात्यांनी सादर केले आहे.

विक्कीचा हा महाअवतार लुक त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला असू इंटरनेटवर आता हा चर्चेचा विषय ठरला आहे. विक्की कौशलचा महाअवतार हा चित्रपट डिसेंबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. अशास्थितीत सुमारे दोन वर्षांपूर्वीच या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

विक्की कौशल आणि मॅडॉक फिल्म्सचे खास नाते राहिले आहे. भूतकाळात विक्की हा निर्माता दिनेश विजान यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसून आला आहे. तर याचबरोबर तो मॅडॉक फिल्म्सकडुन निर्मित छावा या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article