'बच्चन' यांच्या पोस्टने फॅन्स झाले कन्फ्युज्ड ?
मुंबई : सध्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या वैवाहिक जीवन व घटस्फोट याच्यावर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी एक्स (ट्विटर) वर लागोपाठ दोन दिवस पोस्ट शेअर केली आहे. ज्याचा अर्थबोध फॅन्सना न झाल्यामुळे कन्फ्युज्ड झाले आहेत. महानायक बच्चन हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे काल म्हणजे सोमवारी २ डिसेंबरला T- 5210 चूप आणि रागाचा इमोजी तर आज मंगळवारी ३ डिसेंबरला T 5211- चुप चाप, चिडी का बाप आणि झिप लॉक केलेली इमोजी अशा दोन पोस्ट एक्स वर केल्यावर सगळीकडे चर्चा सुरु झाली. यानंतर बच्चन यांच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्येही फॅन्सी काळजी दर्शविली आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचा विवाह २००७ मध्ये झाला. पण जुलै २०२४ मध्ये अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन बच्चन कुटुंबियांसोबत न दिसता वेगळ्या दिसल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण फुटले. या चर्चांना कंटाळून किंवा काही निराशाजनक घडल्यामुळे महानायकांनी अशा पद्घतीची पोस्ट केली असेल, सर चिंता करू नका सर्व काही लवकर ठिक होईल, अशा शुभेच्छाही बच्चन यांच्या फॅन्सनी एक्सवरील पोस्टवर कमेंट मध्ये दिल्या आहेत. सध्या महानायक 'अमिताभ बच्चन' यांचा कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम जोरदार सुरु आहेत.