For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुणराव गोडबोले काळाच्या पडद्याआड !

03:06 PM Oct 15, 2025 IST | NEETA POTDAR
satara   ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुणराव गोडबोले काळाच्या पडद्याआड
Advertisement

            ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक अरुणराव गोडबोले यांचे निधन

Advertisement

सातारा: येथील ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते आणि सातारा शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते अरुणराव रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे मंगळवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास दु:खद निधन झाले.

त्यांच्या मागे बंधू अशोक व डॉ. अच्युत, पत्नी अनुपमा,मुलगा उदयन, सून संजीवनी, एक मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Advertisement

येथील दि युनायटेड वेस्टर्न बँक, आयुर्वेदिय अर्कशाळा, सज्जनगडचे समर्थ सेवा मंडळ, अंत्यसंस्कार सहायक मंडळ अशा अनेक संस्थांमधून त्यांनी विविध पदांची जबाबदारी पेलली. चित्रपट निर्माते म्हणूनही त्यांनी वेगळा ठसा उमटविला. कविता, प्रवासवर्णन, ललित, संत साहित्य, अशा विविध प्रकारचे साहित्य त्यांनी लिहिले. कौशिक प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली.

Advertisement
Tags :

.