महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पद्मनाभस्वामी मंदिरातून पात्राची चोरी, 4 जणांना अटक

06:20 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

केरळच्या तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरातून कांस्याचे पात्र चोरल्याप्रकरणी हरियाणातून 4 जणांना अटक करण्यात आली आहे. या पारंपरिक पात्राला स्थानिक भाषेत उरुली  या नावाने ओळखले जाते. याचा वापर जुन्या काळात पूजा करण्यासाठी केला जात होता. लोक हे पात्र तळघरांमध्ये ठेवायचे.

Advertisement

आरोपींची ओळख पटविण्यात आली असून हरियाणा पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती केरळ पोलिसांनी दिली आहे. आरोपींपैकी एक जण डॉक्टर असून त्याच्याकडे ऑस्ट्रेलियाचे नागरिकत्व आहे. या आरोपीने 3 महिलांच्या एका समुहासोबत मागील आठवड्यात मंदिराला भेट दिली होती. त्यांनी गुरुवारी मंदिरातून पात्राची चोरी केली होती असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मंदिरातून पात्र गायब झाल्यावर मंदिर व्यवस्थापकांनी पोलिसांना कळविले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना शोधून काढले. आरोपींना स्थानिक पोलिसांच्या मदतीने हरियाणात शोधण्यात आले आणि त्यांना ताब्यात घेण्यात  आले आहे. या आरोपींना तिरुअनंतपुरम येथे आणले जाणार आहे. या मंदिरात पोलिसांचा सदैव पहारा असतो. सर्वात सुरक्षित मानण्यात येणाऱ्या मंदिरात चोरीची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article