For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अत्यंत छोटा क्यूब

06:30 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
अत्यंत छोटा क्यूब
Advertisement

किमतीत खरेदी करता येणार दोन 2 बाइक्स

Advertisement

1974 मध्ये हंगेरीचे आर्किटेक्चरचे प्राध्यापक आणि मूर्तिकार अर्नो रुबिक यांनी क्यूब तयार केला होता, ज्याला  रुबिक्स क्यूब म्हटले जाते. हे एक 3डी पझल असते, ज्यात वेगवेगळ्या रंगाचे चौकोनी डबे असतात आणि एका रंगाच्या डब्यांना एकत्र आणायचे असते. हे पझल पूर्ण करणे सोपे नसते, लोकांना मोठी मेहनत करावी लागते. आता या रुबिक्स क्यूबचा एक छोटा वर्जन तयार करण्यात आला असून तो तांदळाच्या दाण्याइतका आहे. याची किंमत पाहता त्यात 2 बाइक्स सहज खरेदी करता येणार आहेत.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जगातील सर्वात छोटा रुबिक्स क्यूब जपानची टॉय मेकिंग कंपनी मेगा हाउसने निर्माण केला आहे. हा इतका छोटा आहे की अत्यंत सहजपणे तुमच्या नखात सामावू शकतो. हा 4.99 एमए रुंद आणि 4.92 एमएम उंच तसेच 4.99 एमएम लांब आहे. हा पझल अॅल्युमिनियमने तयार करण्यात आला असून याचे वजन 0.33 ग्रॅम आहे.

Advertisement

हा क्यूब मॅन्युफॅक्चररच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. एप्रिलपर्यंत हा लोकांना डिलिव्हर करण्यात येणार आहे. या फिरविण्यासाठी चिमट्याची गरज भासणार आहे. प्रत्येक ऑर्डरसोबत एक स्टँड येणार असून त्यावर ‘जगातील सर्वात छोटा रुबिक्स क्यूब’ असे नमूद असणार आहे. हा क्यूब मूळ क्यूबच्या 1000 व्या हिस्स्यासमान आहे. याला अनेक मशीन्स आणि कटिंग टूल्सच्या मदतीने तयार करण्यात आले आहे.

कंपनीने सुमारे 4 वर्षांपूर्वी अशाप्रकारचा क्यूब तयार करण्याविषयी विचार केला होता आणि 2022 मध्ये याची निर्मिती सुरू केली होती. भारतात एक बाइक 1 ते दीड लाख रुपयांपर्यंत खरेदी करता येते. या रुबिक्स क्यूबच्या किमतीत सहजपणे 2 बाइक्स खरेदी करता येणार आहेत. याची किंमत 4.46 लाख रुपये इतकी आहे.

भू

Advertisement
Tags :

.