कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हेरिटास फायनान्सला आयपीओसाठी सेबीची मंजुरी

06:01 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनी इश्यूमधून 2,800 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार

Advertisement

मुंबई :

Advertisement

रिटेल फायनान्सवर लक्ष केंद्रित करणारी नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (एनबीएफसी) व्हेरिटास फायनान्सला त्यांच्या आयपीओसाठी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून हिरवा कंदील मिळाला आहे. कंपनी या आयपीओमधून 2,800 कोटी रुपये उभारू इच्छिते. सार्वजनिक ऑफरमध्ये 600 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि 2,200 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (ओएफएस) समाविष्ट आहे, प्रत्येक इक्विटी समभागांची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. आयपीओमध्ये पात्र कर्मचाऱ्यांसाठी समभागांचे आरक्षण देखील समाविष्ट आहे.

उभारलेल्या निधीचा वापर

आयपीओमधून उभारलेल्या निधीचा वापर कंपनीचा भांडवली आधार वाढवण्यासाठी केला जाईल. याशिवाय, कंपनी व्यवसायाच्या गरजा आणि कर्ज फेडण्यासाठी देखील निधीचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

2015 मध्ये स्थापित, व्हेरिटास फायनान्स काय काम करते?

2015 मध्ये स्थापित, व्हेरिटास फायनान्स सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींच्या आर्थिक गरजा पूर्ण करते. कंपनी लघु व्यवसाय कर्जे, गृहकर्जे आणि वापरलेले व्यावसायिक वाहन कर्जे देण्याची सेवा बजावते. आयसीआयसीआय सिक्युरिटीज-एचडीएफसी बँकेची मुख्य व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने व्हेरिटास फायनान्सला ‘एनबीएफसी-मिडल टियर’ म्हणून वर्गीकृत केले आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, एचडीएफसी बँक, जेफरीज इंडिया, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट यांना आयपीओसाठी मुख्य व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. कॅफिन टेक्नॉलॉजीज या इश्यूसाठी रजिस्ट्रार आहेत. याशिवाय, कंपनी लवकरच आयपीओची तारीख, वाटप तपशील आणि लिस्टिंगसंबंधीची माहिती जाहीर करेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article