महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हेरेव्ह, नेव्हारो, साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत

06:50 AM Sep 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

टायफो, फ्रिट्झ, डिमिट्रोव्ह, झेंग किनवेन यांचीही आगेकूच

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

अमेरिकेचा फ्रान्सेस टायफो, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, ग्रिगोर डिमिट्रोव्ह, टेलर फ्रिट्झ तसेच आर्यना साबालेन्का, एम्मा नेव्हारो, चींनची झेंग किनवेन यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली तर जोकोविचला हरविणारा अॅलेक्सी पॉपीरिन, कॅस्पर रुड, आंद्रे रुबलेव्ह, महिला एकेरीतील विद्यमान विजेती कोको गॉफचे आव्हान संपुष्टात आले.

20 व्या मानांकित टायफोने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना ऑस्ट्रेलिया अॅलेक्सी पॉपीरिनचा 6-4, 7-6 (7-3), 2-6, 6-3 असा पराभव केला. तीन तास हा संघर्ष रंगला होता. पॉपीरिनने तिसऱ्या फेरीत जोकोविचला पराभवाचा धक्का देत त्याचे स्वप्न धुळीस मिळविले होते. टायफोची पुढील लढत नवव्या मानांकित ग्रिगोर डिमिट्रोव्हशी होईल. जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविताना ब्रँडन नाकाशिमाचा 3-6, 6-1, 6-2, 6-2 असा पराभव केला. अडीच तास ही लढत रंगली होती. कारकिर्दीतील त्याचा हा 450 वा विजय होता. या विजयानंतर त्याने वर्षअखेरीस होणाऱ्या एटीपी फायनल्ससाठीही पात्रता मिळविली आहे. सलग सातव्यांदा तो या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून ही स्पर्धा 10-17 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्याची पुढील लढत टेलर फ्रिट्झशी होईल.

बल्गेरियाच्या नवव्या मानांकित डिमिट्रोव्हने 2019नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून त्याने चौथ्या फेरीत सातव्या मानांकित रशियाच्या आंद्रे रुबलेव्हवर 6-3, 7-6, (7-3), 1-6, 3-6, 6-3 अशी संघर्षपूर्ण मात केली. टायफोशी त्याची उपांत्यपूर्व लढत होईल. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या फ्रिट्झने नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 3-6, 6-4, 6-3, 6-2 असा पराभव केला. सुमारे पावणेतीन तास ही झुंज चालली होती.

गॉफला धक्का, किनवेनची विक्रमी लढत

महिला एकेरीत विद्यमान विजेत्या कोको गॉफला पराभवाचा धक्का बसला. तिला एम्मा नेव्हारोने 6-3, 4-6, 6-3 असे हरवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. या पराभवामुळे गॉफची सलग 11 विजयाची मालिकाही खंडित झाली. नेव्हारोने विम्बल्डन स्पर्धेतही गॉफला चौथ्या फेरीत हरविले होते. 31 व्या क्रमांकावर असणाऱ्या नेव्हारोने आता नव्या मानांकनात टॉप टेनमध्ये स्थान मिळू शकेल. नेव्हारोची पुढील लढत पॉला बेडोसाशी होईल. अन्य एका सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या झेंग किनवेनने मध्यरात्री सव्वादोन वाजता संपलेल्या सामन्यात क्रोएशियाच्या डोना व्हेकिकचा 7-6 (7-2), 4-6, 6-2 असा पराभव केला. या स्पर्धेच्या इतिहासात महिलांचा सर्वात उशिरा संपलेला सामन्याचा विक्रम नेंदवला. 2 तास 50 मिनिटे ही लढत रंगली होती.s आर्यना साबालेन्काशी तिची पुढील लढत होईल. सातव्या मानांकित किनवेनने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली असून ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम फेरीतही किनवेन व साबालेन्का आमनेसामने आले होते.

द्वितीय मानांकित साबालेन्काने बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा 6-2, 6-4 असा पराभव करीत शेवटच्या सोळांमध्ये सहज स्थान मिळविले. सलग चौथ्यांदा तिने या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साबालेन्काने 2021 व 2022 मध्ये या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article