महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिखविरोधी दंगल प्रकरणी 31 जानेवारीला निर्णय

06:18 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

काँग्रेस नेते सज्जन कुमारांवर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

1984 च्या शिखविरोधी दंगली प्रकरणी दिल्लीचे राउज अॅव्हेन्यू न्यायालय 31 जानेवारी रोजी निर्णय देणार आहे. हे प्रकरण काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांच्याशी संबंधित आहे. सज्जन कुमार यांच्यावर दंगलीदरम्यान दोन जणांची हत्या केल्याचा आरोप आहे.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर 1984 मध्ये शिखविरोधी दंगली झाल्या होत्या. याचदरम्यान 1 नोव्हेंबर 1984 रोजी पश्चिम दिल्लीच्या राजनगर पार्ट-1 मध्ये सरदार जसवंत सिंह आणि त्यांचे पुत्र तरुण दीप सिंह यांची हत्या करण्यात आली होती. दंगलखोरांच्या जमावाने त्यांचे घर असलेल्या भागात हल्ला केला होता. या जमावाचे नेतृत्व सज्जन कुमार करत होते असा आरोप आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याचाही आरोप तयंच्यावर आहे. दिल्लीतील सरस्वती विहार पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. सज्जन कुमार यांच्या विरोधात दंगल, हत्या आणि दरोड्याचा आरोप करण्यात आला होता.

16 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या सुनावणीत राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांच्याशी संबंधित खटल्याचा निर्णय टाळला होता. निर्णयाची तारीख 8 जानेवारी अशी निश्चित करण्यात आली होती. तर 8 जानेवारी रोजी सुनावणीनंतर निर्णय पुन्हा टाळण्यात आला. दोन्ही वेळेला विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयासमोर तिहार तुरुंगात कैद सज्जन कुमार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले होते.

जुलै 2010 मध्ये कडकडडुमा न्यायालयाने सज्जन कुमार, ब्रह्मानंद, पेरु, कुशल सिंह आणि वेदप्रकाश यांच्या विरात 3 जणांच्या हत्येप्रकरणी आरोप निश्चित केले होते. सज्जन कुमार हे जमावाला चिथावणी देत होते असे सुल्तानपुरी दंगलीतील महत्त्वपूर्ण साक्षीदार चाम कौरने म्हटले होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#tarunbharatnews