महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आप’तर्फे दक्षिण गोव्यात वेंझी व्हिएगस उमेदवार

11:49 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली, पंजाब, हिमाचलनंतर गोव्यातही आपची स्वतंत्र चूल

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचा दक्षिण गोव्याचा उमेदवार म्हणून बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. पक्षाचे गोव्यातील प्रमुख अमित पालेकर यांनी ही घोषणा काल मंगळवारी केली. दिल्ली व पंजाबमध्ये पक्षाने स्वतंत्र वाटचाल करण्याचे ठरविल्यानंतर आता गोव्यातही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र पक्ष अजूनही तडजोडीस तयार असून जाहीर केलेला उमेदवार हा इंडिया आघाडीचाच आहे, असे स्पष्ट करुन पक्षाने काँग्रेसची चिंता वाढविली आहे. राज्यात ‘आरजी’ नंतर आता ‘आप’नेही लोकसभेसाठी स्वतंत्र उमेदवाराची घोषणा केली आहे. आप हा पक्ष इंडिया आघाडीचा घटक आहे. काँग्रेस निर्णय घेण्यास उशीर करतो, म्हणून लोकसभा उमेदवाराची घोषणा आपने केली आहे. काँग्रेस या निवडणुकीबाबत गंभीर असल्याचे दिसून येत नाही, असेही पालेकर म्हणाले.

Advertisement

आपची घोषणा हे एक कोडेच : पाटकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, पालेकर यांनी लोकसभेच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवाराची घोषणा करण्यासाठी अचानक पत्रकार परिषद का घेतली हे एक कोडेच आहे. दक्षिण गोव्याचे प्रतिनिधीत्व कॉंग्रेस पक्षाचे खासदार फ्रान्सिस सार्दिन करीत आहेत, हे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article