45 व्या वर्षी व्हिनस पडली प्रेमात
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
अमेरिकेची आंतरराष्ट्रीय दर्जाची महिला टेनिसपटू व्हिनस विलियम्सला प्रेमाचे अंकूर फुटले आहेत. वयाच्या 45 व्या वर्षी व्हिनस आता एका अमेरिकन अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे.
व्हिनस विलियम्सने यापूर्वी टेनिस क्षेत्रात वावरताना आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटना संदर्भात मौन पाळले होते. पण 2024 च्या उन्हाळी मौसमापासून व्हिनस आणि प्रख्यात अभिनेता आणि निर्माता अॅन्ड्रे प्रेटी यांच्या प्रेम प्रकरणाला प्रारंभ झाला. 2025 च्या प्रारंभी व्हिसन आणि अॅन्ड्रे प्रेटी यांची एकत्रित अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झाली. इटलीतील एका खासगी आलिशान हॉटेलमध्ये व्हिनस आणि तिच्या प्रियकराने काही दिवस घालविले. येत्या सप्टेंबर महिन्यात व्हिनस विवाहाच्या बेडीत अडकणार आहे. व्हिनसची लहान बहीण तसेच माजी आंतरराष्ट्रीय टेनिसपटू सेरेना विलियम्सकडून या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे.