व्हीनस कॉर्नर समस्यांच्या गर्तेत
कोल्हापूर :
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला व्हीनस कार्नर हा कोल्हापूरकरांसाठी महत्वाचा केंद्रबिंदू राहिला आहे. या चौकातून रोज हजारोंची ये -जा होत असते. हा रोड शहरातील मुख्य रस्त्यांना जोडणार एक दुवा आहे. हा रोड रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानकला जोडणारा मुख्य रोड आहे. तसेच येथुन लक्ष्मीपुरी, शाहूपुरी बाजारपेठला जोडणारा मार्ग आहे. त्यामुळे येथे नेहमीच व्यापाऱ्यांची वर्दळ असते. या चौकामध्ये एकूण चार सिग्नल आहेत. या ठिकाणी पाच रस्ते एकत्र आले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करणे आता धोकादायक बनत चालले आहे.
व्हीनस कार्नर येथील सिग्नल एकावेळी दोन ठिकाणचा सुरु होतो. त्यामुळे जर एखाद्या वाहनचालकाला समोर रेल्वेस्थानकाकडे जायचे आहे आणि एकाला शाहूपूरीकडे जायचे असेल तर दोघांमध्ये गेंधळ निर्माण होतो. आणि यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त वाढत चालली आहे.
- वेगवान वाहने आणि अरुंद रस्ता
हा मार्ग प्रमुख विभागांना जोडणारा असल्याने या मार्गावर मध्यवर्ती रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक, बाजारपेठ, जिल्हाधिकारी कार्यालय अशा कार्यालयांना जोडाणारा हा मार्ग असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची वर्दळ असते. चारचाकी, बस, एसटी आणि अवजड वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे या मार्गावरुन ऑफीससाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
- पाच रस्ते येतात एकत्र
या ठिकाणी पाच रस्ते एकत्र येतात. दसरा चौकातून येणारी वाहतूक व्हीनस कॉर्नर येथे येते तसेच वरुन दाभोळकर कॉर्नर, लक्ष्मीपूरी, शाहूपुरी या पाच ठिकाणाहून येणाऱ्या वाहन चालकांमध्ये गेंधळाचे वातावरण निर्माण हेते. यामुळे अपघात होण्याचे प्रकार वाढत आहे. तसेच दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या ठिकाणी डावीकडे रस्त्यावर डिवायडर नसल्याने वाहतूक बेशिस्त पध्दतीने सुरु असते.
- सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत कोंडी
हा रस्ता शहराचा महत्वाचा मार्ग असल्याने नेहमीच या मार्गावरती वर्दळ असते. येथून मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानकाला जोडणारा मार्ग असल्याने या ठिकाणी नागरिकांची तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच येथे शाहूपुरी, लक्ष्मीपूरी अशा मोठ्या बाजारपेठा आहेत यामुळे ही या ठिकाणी व्यापाऱ्यांची, नागरिकांची तसेच वाहतूकीची वर्दळ असते त्यामुळे येथील वाहतूक संथ गतीने चालते आणि यामुळे नागरिकांचा या सगळ्याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
- व्यापारी लाईनकडून येणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
व्यापारी लाईनकडून येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यामध्ये या खड्यांमध्ये पाणी साचते. यामुळे येथून वाहन चालवताना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. तसेच खड्ड्यांमध्ये गाडी गेल्याने गाडीही खराब होते. आणि वाहनधारकालाही इजा होण्याची शक्यता असते. तरी प्रशासनाने या ठिकाणी रस्त्याची लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
व्हीनस कॉर्नर चौक हा शहरातील महत्वाचे ठिकाण आहे. येथे सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक निर्माण करणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने या ठिकाणी योग्य उपाययोजना करणे काळाची गरज आहे.
-राजु बदामे, वाहनचालक