कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

25 ऑक्टोबरला येणार ‘वेनम द लास्ट डान्स’

06:25 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वेनम : द लास्ट डान्स या चित्रपटात एडी ब्राकच्या रुपात टॉम हार्डी पुन्हा दिसून येणार आहे. हा चित्रपट थ्रीडी आणि आयमॅक्स थ्री वर्जनमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा अंतिम ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement

चित्रपटात टॉम हार्डी हा वेनमच्या स्वरुपात दिसून येईल. ही मार्वलच्या सर्वात जटिल व्यक्तिरेखांपैकी एक आहे. ट्रिलॉजीचा हा अंतिम चित्रपट आहे. याचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांचा उत्साह आणखीच वाढला आहे. सोशल मीडियावर अनेक लोक या चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सचे कौतुक करत आहेत. टॉम हार्डीसोबत या चित्रपटात चिवेटेल एजिओफोर, जूनो टेम्पल, राइज इफॉन्स, पॅगी लू, अलाना उबाक, स्टीफन ग्रॅहम मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन केली मार्सेल यांनी केले आहे. याची पटकथा हार्डी आणि मार्सेल यांच्या कहाणीवर आधारित आहे. सोनी पिक्चर्स एंटरटेन्मेंट इंडिया 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूत प्रदर्शित करणार आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article