For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मीना कुमारींवर येणार चित्रपट

06:30 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
मीना कुमारींवर येणार चित्रपट
Advertisement

कमाल अमरोहीसोबतची प्रेमकहाणी झळकणार

Advertisement

सुमारे 3 दशकांपर्यंत बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून अधिराज्य गाजविणाऱ्या मीना कुमारीला कुणीच विसरू शकत नाही. अभिनयाच्या कारकीर्दीसोबत स्वत:च्या खासगी आयुष्यावरून मीना कुमारी मोठ्या चर्चेत राहिल्या होत्या. पती आणि दिग्दर्शक कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्याशी निगडित अनेक किस्से बॉलिवूडमध्ये चर्चेत असतात.

आता या दोघांच्या प्रेमकहाणीवर दिग्दर्शक बिलाल अमरोही एक चित्रपट निर्माण करणार आहेत. याचे नाव ‘कमाल और मीना’ असणार आहे. हा चित्रपट बायोपिक नसेल परंतु मीना कुमारी यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा पैलू मोठ्या पडद्यावर मांडणारा असणार आहे.

Advertisement

मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांनी 1952 मध्ये विवाह केला होता. अभिनेत्रीच्या निधनासोबत हे वैवाहिक नाते संपुष्टात आले होते. चित्रपटाच्या सेटवर या दोघांची प्रेमकहाणी सुरू होत बहरली होती. मीना कुमारी यांनी कमाल यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या ‘पाकीजा’ या चित्रपटात भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. हा चित्रपट अत्यंत स्मरणीय ठरला होता.

Advertisement
Tags :

.