For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या वेंकटेश प्रसाद अध्यक्षपदी

06:06 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या  वेंकटेश प्रसाद अध्यक्षपदी
Advertisement

वृत्तसंस्था / बेंगळूर

Advertisement

भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांची कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत वेंकटेश प्रसाद यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी के. एन. शांताकुमार यांचा 191 मतांनी पराभव केला.

माजी क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांची कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी तर संतोष मेनन यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. 2019 ते 2022 दरम्यान साई मेनन कर्नाटक क्रिकेट संघटनेचे सचिव होते. कर्नाटक क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानांत वेंकटेश प्रसाद यांनी के. एन. शांताकुमार यांचा 191 मतांनी पराभव केला. वेंकटेश प्रसाद यांनी 749 मते तर शांताकुमार यांनी 558 मते मिळविली. माजी पंच बी. के. रवी यांची संयुक्त सचिवपदी निवड झाली आहे. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत बी. के. रवी यांनी 669 मतांनी विजय मिळविला. संघटनेच्या खजिनदारपदासाठी झालेल्या मतदानांत बी. एन. मधुकर यांनी एम. एस. विनय यांचा 736 मतांनी पराभव केला. वेंकटेश प्रसाद यांनी 2010 ते 2013 या कालावधीत कर्नाटक क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 33 कसोटी आणि 161 वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.