कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्ले आगारातून वेंगुर्ले-परेल बस सुरु

04:04 PM Apr 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रवाशांच्या मागणीची आगारातर्फे दखल

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातून वेंगुर्ले-परेल ही बस प्रवाशांच्या मागणीनुसार सायंकाळी 5 वाजता सुरु करण्यात आल्याची माहिती वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी दिली.वेंगुर्ले आगारातून सुटणारी ही बस मठ- कुडाळ- कणकवली -राजापूर -हातखंबा- चिपळूण -महाड -पनवेल दादर -परळ अशा रुटने प्रवास करणार आहे . वेंगुर्ले-परळ ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येत आहे. वेंगुर्ल बसस्थानकावरुन संध्याकाळी ०५:०० वाजता सुटणार आहे. तर परळ वरुन दुपारी ०४:३० वाजता सुटणार आहे.सदर गाडी ऑनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध आहे. सदर गाडीत ७५ वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास करता येईल (अटी लागू) महिला सन्मान योजनेमार्फत सर्व महिला प्रवाशांना तिकीट भाड्यात ५०% सवलत दिली जाणार आहे. (अटी लागू) या मुंबई बस फेरीचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #vengurla # bus # parel
Next Article