For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

निसर्गाशी नाळ जपणारी 'वेळा अमावस्या' उत्साहात साजरी; ओलगे-ओलगे सालम पोलगे घोषणेने शिवारं गच्च

07:28 PM Jan 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
निसर्गाशी नाळ जपणारी  वेळा अमावस्या  उत्साहात साजरी  ओलगे ओलगे सालम पोलगे घोषणेने शिवारं गच्च
Vela Amavasya

उमरगा प्रतिनिधी

Advertisement

कृषी संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेली वेळ अमावस्या गुरुवारी, काळ्याआईची मनोभावे विधीवत पुजा करून असंख्य शेतकरी कुटुंबांनी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली. ओलगे ओलगे सालम पोलगे या घोषाने शिवार गच्च दिसत होते .दुपारी साडेबारानंतर शेतकऱ्यांनी नातेवाईक मित्रपरिवारासह वन भोजनाचा आनंद घेतला.

शेतकरी कुटुंबासाठी वेळा अमावस्याचा सण म्हणजे आनंद, उत्साहाची पर्वणीच असते. पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा खटापोट शेतकऱ्यांना करावा लागतोय. वेळा अमावस्या असल्याने शहरात अघोषित संचारबंदी असते. शेत- शिवारात मौजमजा करण्याला जणू संधीच मिळाली. अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात बुधवारपासूनच (ता.१०) तयारी सुरू होती. गुरुवारी सकाळपासुन ज्वारीचे पीठ, दह्यापासुन तयार केलेल्या अंबिलाचे मडके घेऊन शेतकरी शेत शिवारात जात असल्याने चित्र दिसत होते. आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मडक्याचा प्रवास वहानातुन सुरू असल्याचे चित्र दिसून आले.

Advertisement

बैलांना सजवुन बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. अजुनही बरेच शेतकरी कुटुंब बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. दुपारी बारानंतर शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. ज्वारी, हरभरा, गहू, करडई पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मकरंदाचा आस्वाद चिमूूकल्यांनी घेतला.

Advertisement

आहारात 'आंबिल' स्पेशल
या दिवशी आहारात 'आंबिल' नावाचा पेय पदार्थ असतो. हा देखील विशेष मेनू होय.ताक,दही, लसूण,कांदा पात,ज्वारी व बाजरीचे पीठ, लिंबू,चिंच व कोथिंबीर यापासून आंबिल बनविली जाते.आदल्या रात्री बनवून माठात/बिंदग्यात ठेवले जाते.आंबट ताकात ज्वारीचे पीठ रात्रभर भिजवून त्यामध्ये मीठ व गरम पाणी टाकून फोडणी दिली जाते. आंबिल कितीही प्राशन केले तरी शरीरास त्रास होत नाही. काही प्रमाणात मात्र झोपेची गुंगी येते.

वेळ अमावस्या हिवाळ्यातच...
उत्साह आणि नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणून हिवाळा मानला जातो. आयुर्वेदानुसार, हिवाळा ऋतूनुसार घेतला जाणारा आहार शरीरास पोषक असतो. त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहते. या दिवसांत फळ आणि पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूत प्रचंड भूक लागते तसेच पचनसंस्था चांगली राहते. शरीर कोरडं आणि रुक्ष पडू नये यासाठी अनेकदा स्निग्ध पदार्थ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसांत दूध, तूप, दहीस लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामुळे वेळ अमावस्याला बाजरीची भाकरी आणि गरम पदार्थ्यांची घरोघरी एक मेजवानी असते. त्य़ामुळे दूरवरून लोकं गावामध्ये वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी येत असतात.

Advertisement
Tags :
×

.