महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इचलकरंजीत पाच जणांकडून वाहनांची मोडतोड! संशयितांना अटक 

03:23 PM Sep 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ichalkaranjit Suspects arrested
Advertisement

दोन दिवस पोलीस कोठडी : परिसरात तणावाचे वातावरण

इचलकरंजी प्रतिनिधी

येथील भोने माळ परिसरात भररस्त्यात एकाला अडवून लुटमारी करण्यासह दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. आशादुल्ला हारून जमादार (वय 26), रोहित प्रकाश मांडे (वय 21, दोघेही रा. भोने माळ), अक्षय अशोक घाडगे (वय 22, रा. लिगाडे मळा) आणि अक्षय श्रीकांत बेळगावे (वय 26, रा. लाल बहाद्दूर शास्त्राr सोसायटी) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, या चौघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. तर श्री लोखंडे याला गुरुवारी रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यातील संशयित हे जर्मनी गँगमधील आहेत. हा प्रकार बुधवारी रात्री भोनेमाळ परिसरात घडला. याबाबत महादेव साळी यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली आहे.

Advertisement

फिर्यादी साळी हे बुधवारी रात्री दुचाकीवरुन निघाले होते. ते सरस्वती हायस्कूलजवळ आले असता त्यांना संशयित आशादुल्ला जमादार, रोहित मांडे, श्री लोखंडे, अक्षय घाडगे आणि अक्षय बेळगावे या पाचजणांनी रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील 2700 रुपये काढून घेतले. त्यानंतर जिव्हेश्वर मंदिर मार्गावरून जाताना आरडाओरडा करत यंत्रमागाच्या माऱ्याने चार वाहनांची तोडफोड केली. यावेळी रवींद्र भांडे, उत्तम प्रकाश वडे, युवराज सातपुते आणि विद्या सुतार या चौघांना ढकलून दिल्याने ते जखमी झाले.

Advertisement

याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांच्यासह शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, गावभागचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांना गराडा घातला. रात्री उशिरा याप्रकरणी महादेव साळी यांच्या फिर्यादीनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत दरोडा टाकल्याप्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांपैकी जमादार, मांडे, लोखंडे व घाडगे हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संशयितांकडून दहशतीचा प्रयत्न
संशयितांनी परिसरात दहशत माजवली. यानंतर येथील चौकात ठाण मांडून मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले होते, अशी माहिती घटनास्थळावरील नागरिकांनी सांगितली.

Advertisement
Tags :
IchalkaranjitSuspects arrestedVehicle wreckage
Next Article