For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेल्वेस्थानकात जादा दराने वाहन पार्किंग वसुली

12:10 PM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेल्वेस्थानकात जादा दराने वाहन पार्किंग वसुली
Advertisement

माहितीच्या अधिकारातून माहिती उघड : रेल्वे अधिकाऱ्यांची डोळेझाक

Advertisement

बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातील पार्किंगवरून अनेकवेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीनुसार सध्या आकारले जाणारे पार्किंग शुल्क अधिक आहे. त्यामुळे नागरिकांना वाढीव पार्किंग शुल्क विनाकारण द्यावे लागत असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील यांनी माहितीच्या अधिकारातून पार्किंग शुल्काच्या कंत्राटाची माहिती मागविली होती. रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये मोठा खुलासा करण्यात आला आहे. रेल्वेने निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर लागू करण्यात आले असल्याने पार्किंगबाबत नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत आजतागायत कोणत्याच रेल्वे अधिकाऱ्याला याची जाणीव झाली नसावी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या रेल्वेस्थानकात दुचाकीला दोन तासांसाठी 10 रुपये तर चार चाकीला एक तासासाठी 10 रुपये घेतले जात आहेत. वास्तविक दुचाकीला 6 तासांसाठी 5 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहेत. चार चाकीला दोन तासांसाठी 10 रुपये रेल्वेने निश्चित केले आहेत. त्यामुळे ही एक प्रकारची लूट असल्याची तक्रार नागरिकांमधून केली जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला समज देऊन पार्किंग शुल्क कमी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बेळगाव रेल्वेस्थानकात दररोज 22 ते 24 एक्स्प्रेस दाखल होत असतात. दररोज तीन ते चार हजार प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे रेल्वेस्थानकात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रेल्वेने निश्चित केलेल्या दरानुसारच पार्किंग शुल्क आकारण्याची मागणी केली जात आहे.

Advertisement

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेले पार्किंग शुल्क (18 टक्के जीएसटीसह)

  • दुचाकी- 6 तासांसाठी 5 रुपये
  • दुचाकी- महिनाभरासाठी 150 रुपये
  • दुचाकी- रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी महिन्याला 50 रुपये
  • चार चाकी- प्रत्येक तासासाठी 10 रुपये
Advertisement
Tags :

.