For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाहन अपघातांनी गोवा हादरले

10:14 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाहन अपघातांनी गोवा हादरले
Advertisement

एकाच दिवशी चार अपघातात चार ठार : अनेकजण गंभीर जखमी, वाहनांचे नुकसान

Advertisement

पणजी : या वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल सोमवारी झालेल्या भीषण अपघातांनी गोवा हादरून गेले आहे. राज्यभरात चार वाहन अपघातात चारजण ठार झाले असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अनेक वाहनांची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे. ज्या घरातील लोक अपघातात सापडले त्यांच्या कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.   माशे-दापट (काणकोण) येथे कार व कदंब बसच्या समोरासमोर झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार झाला असून राजेश वेर्णेकर (52, गदग, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. अन्य पाचजण जखमी झाले आहेत. कारमधील कुटुंब कारवार येथून गोव्यात देवदर्शनाला येत होते. कारमध्ये सहाजण होते. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जखमींना काणकोणच्या इस्पितळात प्राथमिक उपचार करून मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले आहे. पर्वरी तोर्ड येथे झालेल्या दुसऱ्या अपघातात कारने सात दुचाकींना ठोकर दिली. यात दुचाकीस्वार दर्शना गावडे ही गंभीर जखमी झाली असून तिला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. पर्वरी पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे. कारचालक मद्यपान करून कार चालवित होता, असा संशय आहे. कारमध्ये दाऊच्या बाटल्याही पोलिसांना सापडल्या आहेत. कारसह दुचाकींची मोडतोड होऊन मोठे नुकसान झाले आहे.

नेसाय स्वयं अपघातात बुलेटचालक ठार

Advertisement

नेसाय कुडतरी येथे झालेल्या स्वयं अपघातात 29 वर्षीय दुचाकीचालक ठार झाला आहे. बुलेटवरून जात असताना त्याचा ताबा सुटला आणि तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीला आदळला, त्यात त्याचा मृत्यू झाला.

मोले स्वयं अपघातात 2 ठार

नंद्रण मोले येथे फोंडा बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर कारगाडीला झालेल्या स्वयं अपघातात कर्नाटकतील दोघांचा मृत्यू झाला आहे. कार गोव्यातून हुबळीकडे जात होती. नंद्रण येथे पोचल्यावर कारचालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि कारने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली, त्यात दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान नागवे येथे जेसीबी अंगावरून गेल्याने प्रशांत पवार (30, वेगसवाडा हडफडे व मूळ कर्नाटक) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडली होती. मयताचा भाऊ अनिल पवार याच्या तक्रारीच्या आधारे हणजूण पोलिसांनी संशयित जेसीबी चालक राजेंद्र शिरोडकर याच्याविरूध्द भा.दं.सं.च्या कलम 279 व 304 अंतर्गत गुन्हा नोंद केला व या गुह्याखाली संशयिताला अटक केली आहे. नंतर त्याची म्हापसा न्यायालयाने जामिनावर सुटका केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश हरिजन करीत आहेत.

Advertisement
Tags :

.