भाजीपाल्याचे दर उतरले; कोथंबीरही स्वस्त! लसुणचे दर चढेच; टोमॅटोच्या दरात किंचत वाढ
वांगी, दोडका, भेंडी, कारल्याची आवक वाढली : कांदा, बटाटा स्थिर : हिरवी मिरची कोसळली : सकरचंदची आवक सुरूच : चिकनच्या दरात किंचित वाढ : मटन, माशांना मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेशोत्सव संपल्यानंतर भाजीपाल्याची आवक वाढली आहे. पावसाने पुर्णपणे उघडिप दिल्याने बाजार समितीमध्ये रोजची आवक वाढत आहे. मागणी असली तरी फळ व पालेभाज्यांचे दर उतरत आहेत. गत आठवड्यात 60 रूपयाला एक असणारी कोथंबीर या आठवड्यात 30 रूपयांवर येऊन ठेपली आहे. कोथंबीरची आवक वाढत असुन पुढील आठवड्याता याचे आणखी दर कोसळण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.
मागील काही दिवसापासून वाढलेले लसणाचे दर अजुनही चढेच आहेत. बाजारात दर्जानुसार 300 ते 400 रूपये प्रतिकिलो असा लसुणचा दर आहे. रोज लसुणची आवक घटत आहे. नवीन लसुण बाजारात दाखल होत नाही, तोपर्यंत याचे दर चढेच राहणार असलयाचे विक्रेत्यांनी सांगितले. टोमॅटोच्या दरात किंचत वाढ झाली आहे. टोमॅटोचे रोज 100 क्रेट बाजारात दाखल होत आहेत. मागणीही जेमतेम असल्याने याचे दर स्थिर राहीले आहेत.
गणेशोत्सव संपल्यानतंर सर्वच भाज्यांची आवक वाढली आहे. वांगी, दोडका, भेंडी, कारली, गवारीची आवक वाढत आहे. गतआठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांनी आवक वाढली आहे. सर्वच भाज्यांचे दर 70 ते 80 रूपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. पुढील आढवड्यात भाज्यांची आवक वाढणार असुन दरही उतरणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. असे असले तरी कांदा-बटाट्याची आवक जेमतेम असल्यामुळे याचे दरातही चढउतार झालेली नाही. हिरव्या मिरचीचे दर निम्याने कोसळले आहेत. गत आठवड्यात 100 रूपये प्रतिकिलो असणार हिरवी मिरची या आठवड्यात 50 रूपये प्रतिकिलोवर पोहचली आहे. फळबाजारात सफरचंदची आवक वाढली आहे.
चिकनच्या दरात किंचित वाढ : मटन, माशांना मागणी
गणेशोत्सव संपल्यानंतर चिकनचे दर हळुहळु वाढत आहेत. चिकनच्या दरात किलोंमागे 10 ते 20 रूपयांची वाढ झाली आहे. गोड्या व सागरी माशांची आवकही वाढली आहे. मटन व माशांना मागणी वाढली आहे. याचे दर स्थिर आहेत.
भाज्यांची दर (प्रतिकिलो)
लसुण : 300 ते 400 रूपये, टोमॅटो : 20 ते 30 रूपये, कोथंबीर : 30 ते 40 रूपयाला एक पेंडी, श्रावण घेवडा :80 ते 100 रूपये, कांदा : 40 ते 50 रूपये, बटाटा (इंदौर) 35 ते 40 रूपये, वांगी : 80 रूपये, दोडका 70 रूपये, ढबु 70 रूपये, भेंडी : 80 रूपये, वरणा : 60 रूपये, हिरवा वाटाणा : 140 रूपये, गवारी : 100 ते 120 रूपये, कारली : 60 ते 80 रूपये, हिरवी मिरची 50 रूपये, बीनिस 200 रूपये, पापडी 100 ते 120 रूपये, काटेरी काकडी : 40 रूपये, फ्लॉवर : 30 ते 50 रूपये एक नग, कोबी : 20 ते 30 रूपये नग, दुधी भोपळा 20 ते 30 रूपये 1 नग, शेवगा 10 रूपयाला 2 शेंग, मेथी : 30 रूपयाला एक पेंडी, शेपू, कांदापात, पोकळा, पालक 20 रूपयाला 1 पेंडी, लिंबू आकारानुसार : 10 रूपयाला 2 नग. बीट : 5 रूपयाला 1 नग.
फळांचे दर (प्रतिकिलो) :
ड्रॅगन : 70 रूपये, सफरचंद (वॉशिंगटन) 150 ते 200 रूपये, सफरचंद (इंडियन) : 100 ते 150 रूपये, सफरचंद (इराणी) : 120 ते 150, सफरचंद (तुर्की) : 150 ते 200 रूपये, डाळींब : 100 ते 120 रूपये, मोसंबी : 50 रूपये, सीताफळ : 100 रूपये, पेरू : 100 ते 120 रूपये, पपई : 20 ते 30 रूपये 1 नग, किवी : 100 रूपयाला तीन नग, ड्रॅगन : 100 ते 140 रूपये, केळी जवारी : 80 ते 100 रूपये डझन, वसई : 30 ते 50 रूपये डझन,
सागरी माशांचे दर (प्रतिकिलो) : सुरमई : 800 ते बाराशे रुपये, पापलेट : 800 ते 1300 रूपये, बांगडा : 200 ते 280 रुपये, रावस : 400 ते 500, सारंग : 500 ते 600 रूपये, पालू : 200 ते 250 रूपये, मांदेली : 160 ते 180 रूपये, बोंबील : 260 ते 320, झिंगा : 400 ते 600 रुपये, शिंपल्या : 160 ते 200, तांबोशी : 600, मोडूसा : 500 ते 600, तारली : 300 ते 400 रुपये, कनक : 600 ते 700,
नदीतील माशांचे दर : (प्रतिकिलो)
टाकळी : 140 रूपये, पालु : 140 ते 200 रूपये, रावस : 160 ते 180 रूपये, मरळ : 300 ते 360 रूपये, रूपचंद : 150 ते 160 रूपये, शिवडा : 300 ते 420 रूपये, कटला : 180 ते 200 रूपये. मांगुर : 120 ते 160 रूपये, रहु : 160 ते 200 रूपये, हैद्राबादी (आंध्रप्रदेश) टाकळी : 120 ते 160 कटारणी : 300 ते 400 रूपये, लोकल रंकाळा, पंचगंगा टिलाप : 100 ते 120 रूपये, वाम (आकारानुसार) 500 ते 600 रूपये नग, वंझ : 300 रूपये, तांबर : 120 ते 160 रूपये.
चिकन, मटण दर : (प्रतिकिलो)
पालव्याचे मटन : 720 रूपये, चिकन स्कीनसह : 150 रूपये, भाता काढलेले : 180 ते 200 रूपये, बॉयलर जिवंत पक्षी : 100 ते 120 रूपये.