दाक्षिणात्य भयपटात वेदिका
दक्षिणेत सध्या अत्यंत प्रभावी कहाण्यांवर चित्रपट निर्माण केले जात आहेत. सध्या दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा दिसून येत आहे. पुष्पा 2 हा चित्रपट याचेच उदाहरण आहे. आता एक भयपट प्रेक्षकांना घाबरवत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री वेदिका दिसून येणार आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरच्या प्रारंभी वेदिकाला तिच्या प्रियकरासोबत दर्शविण्यात आले आहे. अचानक घरात अजब घटना घडू लागतात, वेदिकाच्या बदलेल्या वर्तनामुळे सर्व जण त्रस्त झाल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. या चित्रपटाची निर्मिती दत्तात्रेय मीडियाच्या बॅनर अंतर्गत करण्यात आली आहे. फियर या चित्रपटाची कहाणी हरिथा गोनिनेनी यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
वेदिकाने स्वत:च्या कारकीर्दीची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटांद्वारे केली होती. तिने तमिळ, मल्याळी, कन्नड आणि तेलगू चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली आहे. वेदिकाने यापूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वेदिकाने 2019 मध्ये प्रदर्शित द बॉडी या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत ऋषि कपूर आणि शोभिता धुलिपाला देखील दिसून आली होती.