कायदा आणि सुव्यवस्थेतबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे वक्तव्य
दाक्षिणात्या सिनेइंडस्र्ट्रीमध्ये सध्या 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनावेळी झालेली चेंगराचेंगरी, यात एका महिलेचा मृत्यू यावरून वाद सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात अभिनेता अल्लू अर्जून, त्याचे वडील अल्लू अरविंद, चित्रपटाचे निर्माते आणि तेलुगु कलाकार यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची भेट घेतली. "ही बैठक सरकार आणि चित्रपटसृष्टी यांच्यातील संबंध चांगले रहावेत यासाठी होती", अशी माहिती फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (FDC) चे अध्यक्ष आणि चित्रपट निर्माते दिल राजू यांनी दिली.
हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये ६ डिसेंबर रोजी पुष्पा २ चा शो होता. या शोच्या दरम्यान अल्लू अर्जूनने तेथे हजेरी लावली. त्याला पाहण्यासाठी याठिकाणी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये रेवती नावाच्या ३५ वर्षीय महिलेचे मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी अभिनेता अल्लु अर्जूनला अटक होऊन जामीनावर सुटका सुद्धा झाली. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारने फायद्यासाठीचे शो आणि तिकीट दरवाढीला परवानगी देणार नाही असे जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर तेलुगु सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी, निर्माते यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या भेटीत मुख्यमंत्री म्हणाले, सिनेमा सेलिब्रेटींनी आपल्या फॅन्सच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदार असले पाहीजे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडज़ोड केली जाणार नाही. तसेच थिएटरमधील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.