महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डेमोक्रॅटिक पार्टीच्या संमेलनात वैदिक मंत्रोच्चार

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिकागो : अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रेटिक पार्टीच्या उमेदवाराच्या अधिकृत घोषणेसाठी जारी ‘डेमोक्रेटिक नॅशनल कन्व्हेंशन’च्या (डीएनसी) तिसऱ्या दिवसाची सुरुवात पहिल्यांदाच वैदिक मंत्रोच्चारासोबत झाली आहे. यात पुजारी राकेश भट्ट यांनी शिकागोमध्ये आयोजित डीएनसीच्या तिसऱ्या दिवसाचे कामकाज औपचारिक स्वरुपात सुरु करत आमच्यामध्ये मतभेद असले तरीही देशाकरता आम्हाला एकजूट व्हावे लागेल असे म्हटले आहे. मेरीलँडच्या श्री शिव विष्णु मंदिराचे पुजारी असणारे भट्ट हे मूळचे बेंगळूरचे रहिवासी आहेत. त्यांनी उडुपी येथील मठातून वैदिक ज्ञान प्राप्त केले आहे. तमिळ, तेलगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी, तुळू, संस्कृत भाषेचे जाणकार असलेले भट्ट यांच्याकडे संस्कृत, इंग्रजी आणि कन्नड भाषेतील पदवी आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article