राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत वेदांत, निधी यांचे यश
11:14 AM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
Advertisement
बेळगाव : भुवनेश्वर व हरियाणा येथे झालेल्या सीबीएससी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या वेदांत मिसाळे व निधी कुलकर्णी यांनी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स व अॅक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये वेदांत मिसाळेने 100 व 200 मी. फ्रीस्टाईलमध्ये 2 सुवर्ण तर 50 मी. फ्रीस्टाईलमध्ये 1 रौप्यपदक तर निधी कुलकर्णीने 100 मी. बटरफ्लायमध्ये 1 कास्यंपदक पटकाविले. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर यांचे मार्गदर्शन लाभले तर जयंत हुंबरवाडी, अविनाश पोतदार, माखी कपाडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाने, प्रसाद तेंडूलकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement