जलतरण स्पर्धेत वेदांत मिसाळेची सुवर्णबाजी
बेळगाव : स्विमर्स क्लब आणि अक्वेरियस क्लब यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या आंतर शालेय जलतरण चॅम्पियन स्पर्धेत द.म. शि. मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलचा जलतरणपटू वेदांत आनंद मिसाळेने अतुलनीय कामगिरी करताना प्रथम क्रमांकासह 6 सुवर्ण व 2 रौप्य पदकांसह एकूण 8 पदके जिंकून वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत विविध वयोगटाच्या जलतरण स्पर्धेत वेदांत याने 4×50 मिडले रिले शर्यतीत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक, 200 मी. वैयक्तिक मिडले गटात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक, तर 50 मी. बटरफ्लॉयमध्ये प्रथम क्रमांकाचा सुवर्णपदक, 200 मी. मिडले रिलेमध्ये प्रथम, 100 मी बटरफ्लायमध्ये प्रथम क्रमांकासह दोन सुवर्णपदक, 4×50 मी. मिक्स मिडले प्रथम क्रमांकासह 6 सुवर्ण पदक पटकावले. गट सहामध्ये 6 सुवर्ण पदके मिळवून वैयक्तिक चॅम्पियनशिप मिळवले. 100 मी. बॅकस्ट्रॉकमध्ये व 50 मी. बँकस्ट्रोकमध्ये दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक संपादन केले. शाळेच्या इतिहासात एकाचवेळी गट 6 मध्ये 6 सुवर्णपदक व 2 रौप्यपदक एकुण 8 मिळवून संपूर्ण बेळगाव जिह्यात शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल शालेय मुख्याध्यापिका मायादेवी अगसगेकर यांनी अभिनंदन केले.