वेदा कृष्णमूर्ती निवृत्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या महिला संघाची फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली परंतु ती या खेळाशी इतर कोणत्याही भूमिकेत जोडलड जाईल, असे तिने सूचित केले आहे. कृष्णमूर्तीने 48 एकदिवसीय आणि 76 टी-20 सामने खेळत अनुक्रमे 829 आणि 875 धावा केल्या.
मोठी स्वप्ने पाहणाऱ्या छोट्या शहरातील मुलीपासून ते अभिमानाने भारताची जर्सी घालण्यापर्यंत क्रिकेटने मला धडे, लोक आणि आठवणी दिलेल्या सर्व गोष्टींसाठी मी आभारी आहे. खेळण्याचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, पण खेळाचा नाही. नेहमीच संघासाठी, असे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे. कर्नाटकचा माजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालाशी विवाह केलेल्या 32 वर्षीय कृष्णमूर्तीने 2020 मध्ये मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला टी-20 सामन्यात देशाकडून शेवटचा सामना खेळला होता. तिचा शेवटचा एकदिवसीय सामना 2018 मध्ये झाला होता. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कृष्णमूर्तीचा शेवटचा स्पर्धात्मक सामना मागिल वर्षीच्या महिला प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविरुद्ध होता.