महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तालुक्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

10:49 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करण्यासाठी सुवासिनींची गर्दी : हळदीकुंकू लावून वाटले वाण

Advertisement

तालुक्यात शुक्रवारी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पतीला दीर्घायुरारोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनींनी वडाची मनोभावे पूजा केली. ग्रामीण भागात सणवार, व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. सावित्रीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. यामुळे यमराजाला तिचा पती परत द्यावा लागला. अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आहे. या कथेच्या आधारेच आजही वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात. शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली. सुवासिनी साजशृंगार करून हातामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य घेवून जाताना दिसत होत्या.वटवृक्षाजवळ केळी, फणसाचे गरे, आंबा, धामण,जांभुळ आदींसह विविध प्रकारची फळे ठेवून झाडाला हळदीकुंकू लावून पूजा करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्याभोवती प्रदक्षिणा घालत जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करीत होत्या. सुवासिनी एकमेकींना हळदी पुंकू लावून वाण वाटत होत्या.

Advertisement

पिरनवाडीत बिरदेव मंदिराजवळ झाडाची पूजा 

पिरनवाडी येथील बिरदेव मंदिराजवळ असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. मच्छे येथील डिव्हाईन मर्सी शाळेमागे, श्रीनगरजवळील वडाच्या झाडाची पूजा महिलांनी केली. वाघवडे, संतिबस्तवाड, कर्ले, किणये, झाडशहापूर, देसूर, नंदिहळ्ळी, हलगा, बस्तवाड, जानेवाडी, नावगे, बाळगमट्टी, कावळेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, इनाम बडस, राकसकोप, यळेबैल, बाकनूर, सोनोली, बेळगुंदी, बोकनूर, हंगरगा, मंडोळी, बेनकनहळ्ळीतील महिला वटवृक्षाची पूजा करीत होत्या.

उचगाव परिसरात वटपौर्णिमा भक्तिभावाने

उचगाव परिसरात शुक्रवार दि. 21 जून रोजी वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शुक्रवारी वटपौर्णिमा असल्याने सर्व सुवासिनी या भागातील ज्या ज्या ठिकाणी वडाचे वृक्ष आहेत तेथे जाऊन मनोभावे पूजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी वडाच्या झाडाला फेऱ्या मारून पूजा करून मागणी केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. या परिसरातील उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, तुरमुरी, बाची, कल्लेहोळ, सुळगा, गोजगे, मण्णूर, बेनकनहळ्ळी गावातील सर्व सुवासिनीनी वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाच्या झाडाला धागा गुंडाळून तसेच पूजेमध्ये आंबा, फणसगरे, श्रीफळ, केळी यासह यथासांग पूजा करून आशीर्वाद घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनेक वडाच्या झाडांजवळ सुवासिनींची गर्दी असल्याचे चित्र दिसून येत होते.

कडोलीत वटपौर्णिमा साजरी

कडोली येथे सुवासिनी महिलांनी मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली. येथील बसवाण्णा नगर येथील श्री बसवाण्णा मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाजवळ पूजा करण्यासाठी कडोली, जाफरवाडी येथील सुवासिनींनी विविध पूजा साहित्य, फळे घेऊन सकाळपासूनच गर्दी केली होती. वडाच्या झाडाची पूजा करून सातजन्मी हाच पती मिळावा ही इच्छा बाळगून प्रत्येक सुवासिनींनी वडाच्या झाडाला धागा गुंडाळला. या ठिकाणी महिलांच्या गर्दीने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article